मार्च महिण्याच्या प्रारंभावर उन्हाची दाहकता कित्येक पटीने वाढली असून जंगलातील व इतर सर्वच ठिकाणच्या नैसर्गिक पाणवठ्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. हिमायतनगर तालूक्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी ही तालूक्याची जलवाहिनी म्हटल्या जात आहे
मार्च महिण्याच्या प्रारंभावर पैनगंगा नदी कोरडीठाक पडली असून, पाण्यासाठी मानवासह, वन्य प्राण्यांना भटकंती करावी लागत आहे. वन्य प्राण्यांना त्यांचा रहिवास असलेल्या ठिकाणी पाणी मिळत नसल्याने वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गाव वस्तीकडे धाव घेत आहेत. परीणामी वन्य प्राण्यांच्या जीवितास संभाव्य धोका निर्माण होत आहे.
पैनगंगा उशाला, कोरड घश्याला, असे म्हणण्याची वेळ पैनगंगा नदीकाठावरील नागरिकांवर आली आहे. पैनगंगेत पाणीच नसल्याने पैनगंगेवरून चालणाऱ्या नळ योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत. पैनगंगेला तिसरा कालवा घोषित करावा म्हणून या भागातील नागरीकांनी गेल्या काही वर्षापुर्वी पैनगंगेतच जन आंदोलन पुकारले होते
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले होते. या भागातील नागरीकांची व्यथा अशी आहे की, पावसाळ्यात वरील भागात अतिवृष्टी झाली, आणी इसापूर धरण पुर्ण क्षमतेने भरले की, धरणाचे काहीं दरवाजे उघडण्यात येवून पैनगंगेत अतिरिक्त पाण्याच्या विसर्ग करण्यात येतो आहे
मग पैनगंगा रौद्र रूप धारण करून नदी परिसरातील शेकडो हेक्टर जमिन कवेत घेवून पैनगंगा नदी वाहते. महापुरामुळे नदी काठावरील शेतकऱ्यांच्या पिकांचे न भरून निघण्या सारखे नुकसान होते
पैनगंगेत सध्या पाणीच नाही, अश्या अवस्थेत वन्य प्राणी कसे जगावेत, याची चिंता वन्य प्रेमी नागरीक व्यक्त करीत आहेत. तेव्हा वन विभागाकडून वन्य प्राण्यांना कृत्रिम पाणवठे तयार करूण वन्य प्राण्याच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी. व तसेच पैनगंगेत इसापूर प्रकल्पांतून तात्काळ पाणी सोडून या भागातील नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी या भागातील जनतेतून पुढे आली आहे.

0 Comments