राज्यातील आमदार असो की जिल्ह्यातील आमदार असो त्यांच्या पैकी नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांना इतर आमदारा पेक्षा या विद्यमान आमदाराला एकंदरीत २१२ कोठी रुपयाचा निधी प्राप्त कसा झाला हा संशोधनाचा विषय बनला असला तरी या निधीचे काही दिवसात विकासाचे नारळ फूटणार आहेतच परंतु सदरच्या निधीचे नुसते कागदारच बारा वाजू नये असा सवाल जनतेनी थेट आमदाराच चर्चात्मक करीत आहे
नांदेड जिल्ह्यातील कोणत्या ही आमदाराला आज पर्यंत विकास कामे करण्यासाठी एवढ्या रक्कमेचा निधी मिळाला नाहीत तर नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांना कुठून मिळाला असा ही जनतेतून प्रश्न चर्चेला जात असून या मतदार संघात निधीचा वरचेवर बडीमार होताना दिसत असून येत असला तरी सदरचे कामे लवकर मार्गी लागले तर आलेल्या निधीला महत्व प्राप्त होईल यात काही शंका नाही असे ही जनतेतुन बोलल्या जात आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाचे भवितव्य खरच उज्ज्वल होणार का ? असा प्रश्न करीत जनतेनी पुढील सवाल केला या मतदार संघासाठी २१२ कोठी रुपयाचा निधी आमदार राजेश पवार यांनी खेचून अनित असतील तर त्यांचे अभिनंदन करणे तेवढेच कमी पडेल परंतु या जिल्ह्यातील इतर आमदाराना एवढ्या मोठया रक्कमेचा निधी मिळत नाही का ? असा सवाल करीत नायगाव विधानसभा मतदार संघाचा खरच विकास होणार का ? या प्रश्नाचे उत्तर विकास झाल्या नंतरच कळेल व दिसेल असे ही सदरील जनतेतून बोलल्या जात आहे

0 Comments