केंद्रात व राज्यात काँग्रेसची सता असताना ही जो नांदेड बिदर रेल्वे प्रश्न सुटता सुटला नाही तो भाजप सेनेच्या केंद्र व राज्याच्या सरकारनें हा प्रश्न सोडवला मोदी सरकारच्या आवाजाला प्रतिसाद देत शिंदे व फडणवीस यांच्या व कर्नाटक राज्य सरकारने उचलेला सिहांचा वाटा या मुळे हा प्रश्न माझ्या कारकिर्दीत सोडविण्यासाठी मला जे यश मीळाले त्या बद्दल मला मनस्वी आनंद आहे
असे मत खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी नरसी येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधताना व्यक्त केले.
नरसी येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे यांच्या निवास स्थानी नायगाव नरसी च्या पत्रकारांशी खा चिखलीकर संवाद साधला.ते पुढे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहाजी,नितीन गडकरिजी, व रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे साहेब यांच्या भेटी घेऊन व त्यांच्या पुढाकाराने हा प्रश्न आपण लावून धरला आहे
सकारात्मकता दाखवल्या नंतर राज्यातील शिंदे फडणवीस यांच्या राज्य सरकारने व कर्नाटक चे खासदार यांच्या माध्यमातून तेथील सरकारने आपला वाटा उचलल्या नंतर हा प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागला त्या मुळे हा प्रश्न सुटला असून आता रीतसर मार्गाने हा प्रश्न २०२४ पर्यंत सोडवण्यासाठी आपण प्रयत्न शील राहून तो पूर्णत्वास नेण्याची आपली इच्छा आहे असे त्यानी सांगितले
" दाजी भावजीने विकास कमी राजकारण अधिक केले "
ते म्हणाले नांदेड जिल्ह्यात काही प्रश्न प्रलंबीत ठेवुन दाजी भावजी ने विकास कमी विकासाचे राजकारण केले या मुळे नांदेड बिदर रेल्वे प्रश्न रखडत ठेवत यावर निवडणुका जिंकल्या असा आरोप करीत हा प्रकार म्हणजे जनतेची दिशाभूल करून निवडणुका जिंकण्यासाठी केलेले राजकारण होय
असा स्पष्ट आरोप करत दाजी भावजीच्या राजकारणाला जनता ओळखली असून नांदेड बिदर प्रश्न सोडवून भाजपने विकास कसा असावा हे दाखवून दिले असे खा चिखलीकर यानी पत्रकार परिषदेतून मांडले.अशोक चव्हाण व खतगावकर यांचे नाव नघेता त्यानी ही टीका केली
नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने विकासाचे राजकारण करीत कोलंबी लिफ़्ट एरिकेशन च्या प्रश्नाचे राजकारण करण्यात आले नाव कोलंबी असले तरी त्याचा फायदा मात्र इतर गावांना अधिकचा असल्याचा प्रश्न उपस्थितीत करताच खा चिखलीकर यांनी या विषयी कुष्णुर व मांजरम च्या व इतर गावच्या नागरिकांनी अनेक वेळा प्रश्न आपल्या समोर मांडला आहे
या विषयी संबधीत विभाग व राज्य मंत्री यांच्या समवेत बैठक घेऊन या प्रश्नावर सर्व गावांमध्ये पाणी पुरवठा कसा करता येईल या साठी पुढाकार घेऊन प्रयत्न करणार असल्याचे खा चिखलीकर यांनी सांगितले
या वेळी नायगाव तालुक्यातील पत्रकार बांधव व नरसी भाजप पदाधिकारी यांनी नांदेड बिदर रेलवे प्रश्न सोडवल्या बद्दल खा.चिखलीकर व भाजप जिल्हाध्यक्ष वेंकट पा गोजेगावकर यांचा सत्कार करण्यात आला.या पत्रकार परिषदेला भाजप प्रदेश सदस्य बालाजी बचेवार, भाजप जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर,श्रावण पा भिलवंडे,यादवराव तुडमे, अशोक पाटील मुगावकर आदींची उपस्थिती होती

0 Comments