Header Ads Widget

शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय महिलेचा वादळी वाऱ्यात तुटलेल्या तारा विद्युत प्रवाह असल्याने शॉक लागून दुर्दैवी मृत्यू - बारड येथील घटना -

       माधव पवार
मुदखेड तालुक्यातील बारडच्या इंदिरा नगर भागात  रहिवासी असणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेनी आपल्या जनावरासाठी शेतात चारा आणण्यासाठी गेली असता तिला वादळी वाऱ्यात तूटलेल्या तारात विद्युत प्रवाह असल्यामुळे तिचा हात लागून धुरपातबाई पिराजी रापनवाड मृत्यू झाला असल्याच्या घटना बारड येथे घडली आहे 

गेल्या दोन ते तीन दिवसा पासून या तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गाराचा पाऊस पडला असल्यामुळे या वादळी वाऱ्यात विद्युत वितरण कंपनीचे तारे तुटून जमिनीवर पडले होते त्या ताराला सदरील मयत महिलेचा हात लागल्याने ती जागीच मृत्यू पावली आहे 

विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने व कर्मचाऱ्यांनी सदरच्या वादळी वाऱ्यात तूटलेल्या तारातील विद्युत सदरचा पुरवठा खंडित करण्या ऐवजी ते चालूच ठेवले असल्यामुळे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

तुटलेल्या तारात विद्युत पुरवठा चालू होता सदरची महिला ही चारा घेत असताना तिच्या हाताला सदरचा तार लागला असल्याने ते जागी मृत्यू पावल्याची घटना दिनांक २० मार्च २०२३ रोजी सकाळी दहा ते साडे सहा वाजण्याच्या दरम्यान घडली असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे 

बारड इंदिरा नगर येथील रहिवासी मयत महिला धुरपातबाई पिराजी रापनवाड ५५ वर्ष ही महिला शेतात जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेली गेली असल्याचे सांगण्यात येते शेतात विद्युत तारेला त्या मयत महिलेचा हाताला विद्युत प्रवाहाचा तार लागला व शॉक लागून या दुर्घटनेत महीलेचा मृत्यू झाला आहे

Post a Comment

0 Comments