सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा असलेला विषय म्हणजे जुनी पेन्शन महाराष्ट्र शासनाने शासकीय, निमशासकीय सर्व स्तरावरील २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी असणारी जुनी पेन्शन योजना बंद केलेली होती ती पुन्हा सुरू करावी यासाठी हिमायतनगर येथे महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना पेटून उठली असून याबाबत ती आक्रमक झाली असल्याचे पहावयास मिळत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,आज दिनांक १४ मार्च २०१३ रोजी तहसील कार्यालय हिमायतनगर येथे महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना यांनी बेमुदत संपावर गेल्याची जाहीर केले व संपावर बसलेले आहेत याबाबतचे निवेदन संघटनेने हिमायतनगरचे नायब तहसीलदार विकास राठोड यांना दिले आहे
यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी एकच विषय जुनी पेन्शन, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, जुनी पेन्शन भेटलीच पाहिजे अश्या घोषणा यावेळी दिल्या हिमायतनगर तहसील समोर कर्मचारी संघटनेने बस्तान मांडून बेमुदत संप सुरु केला आहे. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे यासाठी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली
२००५ पूर्वी व २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र शासनाने जुनी पेन्शन योजना बंद केली असून नवीन पेन्शन योजना लागू केली आहे. कर्मचाऱ्यांचे व कुटुंबाचे भविष्य अंधकारमय करणारी ही योजना कर्मचाऱ्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण करणारी आहे. सन २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेतर्फे बेमुदत संप पुकारलेला आहे.या संपात तालुक्यातील सर्व कर्मचारी वर्ग सक्रिय सहभागी होते. सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू केल्याशिवाय संबंधित कर्मचारी कामावर रुजू होणार नाही याची गंभीरपणे नोंद घ्यावी व सर्व कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करणारी जुनी पेन्शन योजना लागू करावी असे या निवेदनात कर्मचारी संघटनेने लिहिलेला आहे.
यावेळी जुनी पेन्शन तालुका अध्यक्ष माने सर, अंबाड सर, विजय धोबे सर, अशोक कपाळे सर,कैलास नकुले सर,इंगळे सर, भालेराव सर, संदीप पाटील , महसूल विभाग - राठोड ,कृषी विभाग - सुदेवाड,आरोग्य विभाग गायकवाड यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

0 Comments