नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथे एका घरी बसू पालकांच्या म्हैशीवर वीज कोसळल्याने म्हैस जाग्यावर ठार झाल्याची घटना दिनांक १६ मार्च २०२३ रोजी दुपारी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याची माहिती गावाच्या तलाठी करवंदे मॅडम यांनी दिली असून सदरची घटना कृष्णूर शिवारात घडली आहे
तालुक्यातील सकाळ पासूनच आकाशात ढगाळ वातावरण होते आणि यापूर्वी सुद्धा हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी वादळी वाऱ्यासह पाऊस गारा आणि विजेचा कडकडाट होईल असा त्यांनी विचारा दिला होता त्यानुसार कृष्णूर येथील गरीब शेतकरी किरण कोंडीबा जाधव यांच्या म्हैशीवर विज पडल्यामुळे सदरची म्हैस जाग्यावर ठार झाल्याचे वर्त आहे
नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या आदेशानुसार कृष्णुर तलाठी करवंदे मॅडम यांनी सदरील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन वीज पडून ठार झालेल्या म्हैशीचा पंचनामा केला असल्याची माहिती मिळत असून या नैसर्गिक आपत्तीत पशुपालक किरण कोंडीबा जाधव यांचे म्हैस ठार झाली असल्यामुळे ७० ते ८० हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे

0 Comments