Header Ads Widget

वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या टाळकी हरभरा गहू यांचे तात्काळ पंचनाम्या बरोबर कृष्णूर येथील शेतकऱ्याच्या म्हैशीवर विज पडून ठार झाली त्यांना ही मदत द्या - शिवराज पाटील होटाळकर

       माधव पवार
नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यात दिनांक १६ मार्च २०२३ रोजी दुपारी चार ते पाच वाजण्याच्या वादळी वाऱ्यासह काही भागात गाराचा पाऊस पडला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील गहू हरभरा टळक्या या पिकांची नुकसान झाले आहे 

नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह तहसील विभागाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून भरीव आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून केली आहे
नायगाव धर्माबाद उमरी तालुक्यात दिनांक १६ मार्च २०२३ रोजी सकाळपासूनच आकाशात ढगाळ  वातावरण होते त्या ढगाळ वातावरणाचा फटका या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला असल्यामुळे शासनाने तात्काळ त्यांच्या शेतातील हरभरा गहू टाळक्या ज्वारीचे पंचनामे करावेत असे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी सांगितले आहे 

प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन आर्थिक मदत जाहीर करावी असे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा सरचिटणीस व माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी मागणी केली आहे
महसूल प्रशासनाचे कर्मचारी संपावर गेले असल्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा सामना शेतकऱ्यांनाच करावा लागत असल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी व पुरोगामी विचाराचे अभिजीत राऊत यांनी तात्काळ लक्ष घालून वादळी वाऱ्यासह पाऊस पडलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असल्याने व कृष्णुर येथील रहिवासी असलेल्या गरीब शेतकऱ्याच्या म्हैशीवर विज कोसळून ठार झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावे अशी ही मागणी केली आहे

तालुक्यातील कृष्णूर येथील शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीत  मध्ये ८० हाजार रुपयाचे नुकसान असल्यामुळे त्यांना सुद्धा प्रशासन तात्काळ आर्थिक मदत करावी असे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांची मागणी जोर धरित आहे 

Post a Comment

0 Comments