नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे मित्र तथा धर्माबाद नगरीचे माजी उपनगराध्यक्ष कंदनूरी मौगला गौड वय ६५ वर्ष यांचे तिरूपती येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी दोन वाजता प्राणज्योत मालवली आहे.सदरील घटनेची माहिती शहरात पसरताच शहरावर शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धर्माबादचे माजी उपनगराध्यक्ष कंदनूरी मौगला गौड यांनी तिरुपती दर्शनासाठी पत्नीसोबत गेले होते. व तिरुपती बालाजीचे दर्शन अगदी जवळून घडावे, यासाठी मौगला गौड यांनी येथील उद्योजक सुबोध काकाणी यांच्याकडे व्ही.आय.पी.दर्शन तिकिट मिळवून देण्याचा आग्रह केला होता.
यावरून उधोजक सुबोध काकाणी यांनी दि.४ मार्चचे कल्याण उत्सव दर्शन तिकिट मौगला गौड यांना उपलब्ध करून दिले. मौगला गौड व त्यांची पत्नी दर्शन करून तिरूपती येथे आले असता,त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांची पत्नी तिरुपती येथील एका खासगी रुग्णालयात मौगला गौड यांना उपचारासाठी दाखल केले. सदरील घटनेची माहिती मौगला गौड यांच्या परीवारातील सदस्यांना कळताच,त्यांनी तिरूपती येथे जाऊन त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत होते.
गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. व त्यांची प्रकृती चांगली होती.परंतु अचानकच बुधवारी दुपारी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे त्यांचे लहान बंधू मुरली गौड यांनी सांगितले आहे. बुधवारी दुपारी अंदाजित बारा वाजण्याच्या दरम्यान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मौगला गौड यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे मुरली गौड यांनी सांगितले आहे.
गुरुवारी दुपारी तीन वाजता शहरातील वैकूंठधाम येथे अंत्यविधी होणार असल्याचे त्यांचे बंधू मुरली गौड यांनी सांगितले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी, चार भाऊ असा मोठा परिवार आहे. माजी उपनगराध्यक्ष मौगला गौड हे माझे फार जुन्ने मित्र होते.
त्यांच्या दुःखद निधनामुळे परीवारावार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या दुःखात चिखलीकर परीवार सहभागी असल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी बोलताना सांगितले आहे.

0 Comments