Header Ads Widget

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लिटल स्टेप इंग्लिश स्कूल नायगाव येथे महिला सन्मानित

      माधव पवार
लिटल स्टेट इंग्लिश स्कूल नायगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त शाळेमध्ये कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला आहे 

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण शाळेच्या शिक्षिका सौ.अश्विनी बेंद्रीकर ,माता पालक संघाच्या प्रतिनिधी सौ.स्वरूपा शिंदे, सौ.गंगासागर हंबर्डे  यावेळी उपस्थित होत्या महिला शिक्षकांच्या वतीने या प्रमुख अतिथींचा सन्मान व सत्कार करण्यात आला आहे
सौ बेंद्रीकर मॅडम यांनी महिला सबलीकरणाच्या माध्यमातून महिलांनी समोर कसं जावं, विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा अभ्यास करत असताना विद्यार्थिनींना काय अडचण येतात त्या कशा सोडवल्या पाहिजे त्या संदर्भात उत्तम असं मार्गदर्शन केले आहे 

सुरेखा शिंदे यांनी गृहिणी म्हणून आपल्या बाळांची काळजी कशी घेतली जावी,आपल्या मुलींना मोठं कसं करता यावं यासाठीचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.प्रियंका शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.हणमंत जाधव सर यांनी केलं.

Post a Comment

0 Comments