Header Ads Widget

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने कर्तबगार पोलीस महिलांचा विशेष सन्मान


नागोराव शिंदे :  पळसपुरकर : -


हिमायतनगर येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हिमायतनगर येथील कर्तबगार पोलीस महिलांचा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला आहे

यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष नागोराव शिंदे पळसपुरकर, तालुका संघटक विजय वाठोरे, बाबाराव  जरगेवाड,अभिषेक बक्केवाड यांच्या हस्ते करण्यात आला आहे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हिमायतनगर येथील कर्तबगार महिला हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या सरसम बु. पळसपुर येथील बीट अंमलदार या पदावर कार्य करणाऱ्या कोमल कांगणे मॅडम जनतेच्या संरक्षणासाठी प्रतेक क्षणी तत्पर असतात. त्यांच्यामुळे तालुक्यातील महिला वर्गांना सुरक्षा प्रदान होते

अशा या कर्तबगार महिला कांगणे मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे 

वार्षिक आढावा बैठक निमित्ताने हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे आलेले भोकरचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांची भेट घेत त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे 
   
यावेळी जेष्ठ पत्रकार महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष नागोराव शिंदे पळसपुरकर , बाबाराव जरगेवाड, तालुका संघटक विजय वाठोरे, अभिषेक बकेवाड, मुन्ना भाऊ शिंदे निलेश चटणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी चौधरी,पोटे , नागरगोजे, स्थानिक बिट अमलदार अशोक सिंगनवाड, पवन चौदंते यांच्यासह पोलीस स्टेशन मधील सर्व कर्मचारी वर्ग यांच्यासह आदीजण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments