Header Ads Widget

पाझर तलावाची पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी व जलसाठा वाढविण्यासाठी सावरखेड कृष्णूर जुन्ने तळे व कारखान्या जवळील तळ्याच्या पाळूची उंची वाढवा - मागणी -

       माधव पवार
केंद्र सरकार सन १५ ऑगस्ट २०२२ रोजी देशाच्या स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त राज्यासह ग्रामीण भागात ही सदरच्या अमृत महोत्सवी अमृत सरोवर निर्मिती करण्यासाठी व महत्व देण्यासाठी सरकारने लघु पाटबंधारे विभागा अंतर्गत येणाऱ्या तळ्याची पाळू उंच करणे काम व्यवस्थित करून तळ्याचे सुशुभिकरण करण्याचे काम शासनाने केले आहे
राज्यासह नांदेड जिल्ह्यात सुद्धा अशाच पद्धतीचे काम करण्यात आले आणि नायागांव तालुक्यातील रुई बु कृष्णूर येथील पाझर तलावाचे काम करण्यात आले व त्या तळ्यावर दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी तिरंगा ध्वज फडकविण्यात आला आहेग्रामीण भागातील पाझर तलावाच्या कामाला शासनाने प्रधान्य देऊन याच योजने अंतर्गत सरकारने सावरखेड व कृष्णुर येथील जुन्या तळ्याच्या पाळूची उंची व दुरुस्तीचे कामे करण्यात यावे त्याच बरोबर कुंटूर शुगर ऍग्रो कारखान्या जवळील तळ्याचे काम ही तात्काळ करण्यात यावेत अशी मागणी होत आहे 

नायागांव तालुक्यातील पाझर तलावाच्या पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी व जलसाठा वाढविण्यासाठी सावरखेड कृष्णूर जुन्ने तळे व कारखान्या जवळील तळ्याच्या पाळूची उंची वाढविण्याची गरज असल्यामुळे राज्य सरकारनी सदरचे कामे रोजगार योजने अंतर्गत चालू करून मजुराच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी या भागातील नागरिकांसह मजुरातून मागणी होत आहे 

Post a Comment

0 Comments