धावपळीच्या जीवनात मानव धर्मातील मानवाने आपला सुखी संसार व आनंदी जीवन जगण्यासाठी व समाधान प्राप्त होण्यासाठी मानवानी संत गणाची साथ धरावी असे उद्गार दैनिक प्रजावानेचे पत्रकार तथा शि भ प प्रसिद्ध कीर्तनकार विकास भुरे यांनी नांदेडच्या सिडको येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवलिंगेश्वर मंदिर सिडको येथे अखंड शिव नाम सप्ताहाच्या कार्यक्रमात भाविक भक्तांना संबोधित केले नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील व ग्रामीण भागात वावरत असलेल्या मांजरम नगरीचे ज्येष्ठ पत्रकार तथा कीर्तनकार शि भ प विकास भुरे यांनी या कार्यक्रमात भक्तगणाला संभोधित करताना पुढे म्हणाले की आपल्या मानव धर्मातील मानवाच्या जीवनात अतिशय सुख आणि समाधान प्राप्त करायचे असेल तर संतांच्या संगतीत आल्या शिवाय कोणालाही सुख समाधान मिळत नाही असे ही प्रसिद्ध कीर्तनकार विकास भुरे यांनी सांगितले आहेएका नामांकित दैनिक प्रजावाणीचा पत्रकार जेव्हा प्रसिद्ध कीर्तनकार होतो तेव्हा --
नायगाव तालुक्यातील मोजे मांजरम येथील रहिवासी असलेले दैनिक प्रजावाणी वृत्तपत्रात अनेक वर्षापासून काम करणारे व छंद हेच जीवन असे म्हणत आपल्या जीवनाचे काही तरी सार्थक व्हावे म्हणून संत संगतीचा मार्ग स्वीकारला असल्यामुळे त्यांच्या विचाराची फळ भाविक भक्तांच्या माध्यमातून मिळत असल्याने सुंदर असे कीर्तनकार बनले आहे
सदरच्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे काम पत्रकार तथा प्रसिद्ध कीर्तनकार विकास भुरे हे ग्रामीण भागातून काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत
सिडको नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या सप्तहाच्या
कार्यक्रमात पुढे बोलताना शि भ प प्रसिद्ध कीर्तनकार विकास भुरे मांजरमकर भक्तगणाला मार्गदर्शन करताना असेही सांगितले की " शकुन या शब्दाचा अर्थ " शुभ संकेत असून मानवी जीवनात संत शिरोमणी मनमत माऊली संकेत देताना सांगतात की आपल्या जीवनात पाप ताप दैन्य नाहीसी होतात आणि जीवनात मानव सुखी होतो म्हणून मानव आणि संत दर्शनाला अतिशय महत्त्व द्यावे असा ही संदेश विकास भुरे यांनी दिला आहे

0 Comments