Header Ads Widget

नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड रोडवर असलेल्या मूगट पेट्रोल पंपा जवळ आयचर आणि ऑटोच्या भीषण अपघातात एका लहान बालकासह चार जण ठार - पोलीस घटनास्थळी रवाना

            माधव पवार
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील मुगट पेट्रोल पंपाजवळ दिनांक ३० मार्च २०२३ रोजी सकाळी साडे दहा ते आकारा वाजण्याच्या दरम्यान झालेल्या आयचर आणि ऑपेऑटोच्या जब्बर धडकेत एका बालकासह चार जण ठार झाल्याची घटना आहे

मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याची माहिती पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले असल्याचे जेमादार बालाजी गिते यांनी सांगितले आहे
नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड रोडवर असलेल्या मूगट पेट्रोल पंपा जवळ आयचर आणि ऑटोच्या भीषण अपघातात एका लहान बालकासह चार जण ठार - पोलीस घटनास्थळी रवाना होऊन सदरील घटनेचा ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक अंनतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला व प्रेत ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे 

मुदखेड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नांदेड रोडवर असलेल्या मुगट पेट्रोल पंपा जवळ ऑटो आणि आयचरच्या अपघातात चार जण ठार झाल्याची दुर्दैवी माहिती मिळते यात सहा ते सात महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुःखत घटना घडली असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे 
नांदेड ते मुदखेड मुगट पेट्रोल पंपा जवळील अपघातात मृत्यू  झालेले सरोजा रमेश भोई ४० राहणार मेहकर बुलडाणा गाली कल्याण भोई २४ राहणार गेवराई बिड जोयल कल्याण
भोई वय सहा ते सात महीने अन्‌ ओळखी जेष्ठ नागरिक वय ७० वर्षाचा असल्याचा समावेश असला तरी लवकरच त्या अनोळखी व्यक्तीची माहिती लवकरच मिळण्याची शक्यता आहे

सदरच्या घटनास्थळी अतिदक्ष मानली जाणारी रुग्णवाहीका दाखल झाली डॉ.शेशीकरण जाधव यांच्यासह चालक शेख खयुम चोक कामगिरी बजावली असून या घटनेतील संपूर्ण माहिती काही वेळात नायगाव फास्ट न्यूजला मिळणार आहे

मुदखेड -नांदेड हा रस्ता नागमोडी प्रकारचा आहे,यामुळेच अपघात संख्येत वाढ....

नांदेड हुन १ आसना मार्ग ( त्रिकुट- मातासाहेब ) ब्राह्मणवाडा किंवा, २ ) वाजेगाव (गोदावरी पूल) आमदुरा मार्ग ह्या दोन्ही मार्गावर बऱ्याच ठिकाणी नागमोडी वळण रस्ते असल्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. आज घडलेला अपघातही वळण रस्स्त्यावरच घडला आहे 

Post a Comment

0 Comments