Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघात भाजपाच्या गटबाजीमुळे मा.शिवराज पाटील होटाळकराचा मार्ग मोकळा होणार ? येथे पक्ष वाढीसाठी कोणाचे योगदान !!

       माधव पवार
नांदेड जिल्ह्याचे विद्यमान भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे भाजपा पक्षाने जिल्ह्याची जबाबदारी दिल्याच्या नंतर सुद्धा याच पक्षातील हम भी पुढारी है असे म्हणणारे लोकप्रतिनिधी आता भाजपा पक्षाच्या नेतृत्वात वरिष्ठ पातळीवर राहून नायगाव विधानसभा मतदारसंघात आपापली गटबाजी निर्माण करून वर्चस्व पणाला लावण्यासाठी प्रयत्न करीत आहे

या मतदार संघातील विधानसभेच्या निवडणुका आगामी काळात असल्या तरी मा.शिवराज पाटील होटाळकर यांच्यासाठी भाजपा पक्षा कडून पॉझिटिव्ह बाजू निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे भाजपाच्या गटबाजी वरून दिसून येत आहे

नायगाव विधानसभा मतदार संघात अनेक नामांकित भाजपाचे पुढारी असले तरी नेमके भाजपाचे रोपटे कोणी ? लावले हे विशेष महत्वाचे आहे 

प्रथम नायगाव तालुक्यात बालाजी बच्चेवार भजपा पक्षाच्या माध्यमातून कमळ फुलविण्यासाठी गेल्या अनेक वर्षाखाली रोपटे लावले असल्याने यांना ही भाजपानी विसरून चालणार नाही आणि त्याच बरोबर श्रावण पाटील भिलंवडे यांनी सुद्धा भाजपा पक्ष वाढीसाठी अतिशय महत्वाची कामगिरी बजावली यांना सुद्धा पक्षांनी विसरून चालणार नाही अशी तमाम जनता म्हणत आहे

सध्याच्या परिस्थितीत या नायगाव मतदार संघाचे भाजपा रिपाईचे आमदार राजेश पवार हे भाजपा पक्षात असले तरी त्यावेळी नायगाव तालुक्यात पक्ष वाढीच्या संदर्भात त्यांचे काय ? योगदान असू शकते हे सदरची जनता ठरविते राजकीय पुढारी नाही हे स्पष्ट चित्र आहे 

यातच भाजपा पक्षाचे माजी शिक्षण सभापती विद्यमान शिवराज पाटील होटाळकर हे अल्पवधीत भाजपाचे पक्षाचे ग्रामीण नेतृत्व करण्यात मोठा पुढाकार घेतला असल्यामुळे येत्या येणाऱ्या आघामी काळातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी का ? समोर येतोय अतिशय महत्वाचा प्रश्न मानला जात आहे

Post a Comment

0 Comments