Header Ads Widget

माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर भावी आमदार नव्हे आमदारच ! समाधान महाराज भोजेकर यांच्या शुभेच्छा !!

       माधव पवार
या पृथ्वी तलावर मानव धर्मात वावरत असताना कोणी आईची जयंती केली असेल पुण्यतिथी केली असेल कोणी वडीलाची जयंती केली असेल कोणी पुण्यतिथी केले असेल परंतु नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात कै.डी बी पाटील यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी आपल्या भावाची जयंती करून भव्य असा कीर्तन सोहळा आयोजित केला आहे

नायगाव येथे भावानीच भावाचा जयंती सोहळ्याचा कार्यक्रम घडवून आणला माझ्या बावीस वर्षाच्या कार्यकाळातील हा पहिलाच जयंती सोहळा पाहण्यास मिळाला असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्ध कीर्तनकार समाधान महाराज भोजेकर जळगाव यांनी आयोजित करण्यात आलेल्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमा  निमित्त आपल्या कीर्तन रुपी कीर्तनातून सांगितले आहे

नायगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कै. डी बी पाटील यांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून बोलताना महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार समाधान महाराज भोजेकर यांनी असे म्हणाले की आज पर्यंतच्या काळात कोणत्या ही कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तन करीत असताना राजकीय नेत्यांना माझ्या वतीने कोणत्याच प्रकारच्या शुभेच्छा दिल्या नाहीत परंतु माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांना आमदार होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे 

भावा भावाचे नाते हे अतिशय रक्ताचे असल्यामुळे कै. डी बी पाटील होटाळकर यांचा जयंती सोहळा भाऊ म्हणजे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी घडवून आणला या कीर्ती रूपवानाची नायगाव विधानसभा मतदारसंघात भावी आमदार म्हणून चर्चा होतोय ते भावी आमदार नव्हे या मतदार संघाचे आमदारच होणार असल्याचे मत ही यावेळी समाधान महाराज भोजेकर यांनी आयोजित करण्यात आलेल्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात ते व्यक्त केले आहे

Post a Comment

0 Comments