माधव पवार
पोलीस खात्यात कार्यरत असलेले व लाच प्रकरणातील आरोपी बालासाहेब नरोबा पांढरे, वय ५६ वर्षे व्यवसाय नोकरी पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस स्टेशन किनवट जिल्हा नांदेड राहणार कमलाई नगर हदगाव तालुका हदगाव तक्रार प्राप्त दिनांक १८ मार्च २०२३ रोजी लाच मागणी करण्यात आलीसदरची पडताळणी दिनांक २० मार्च लाच स्विकारली दिनांक २० मार्च रोजी लाचेची मागणी रक्कम दहा हाजार रुपये स्विकारली रक्कम तीन हजार घेताना रंगेहात पकडण्यात आले
तक्रारदार त्यांची पत्नी व दोन मुलां विरुध्द पोलीस स्टेशन किनवट येथे भारतीय दंड संहिता कलम ३२४,३२३,५०४ ५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल आहे
सदर गुन्ह्यात आरोपींना अटक न करता नोटीस देऊन सोडून दिले म्हणुन व यापुढे गुन्ह्याच्या तपासात आरोपींना मदत करण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना दहा हाजार रुपये लाचेची मागणी करून पाच हजार रुपये या पूर्वीच स्विकारले व उर्वरित पाच हजार रुपये दिनांक २० मार्च २०२३ रोजी घेऊन येण्याचे सांगितले होते
आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन किनवट जिल्हा नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे सदरील सापळ्यातील मार्गदर्शक डॉ राजकुमार शिंदे पोलीस अधिक्षक अँटी करप्शन ब्युरो नांदेड परिक्षेत्र नांदेड पर्यवेक्षण अधिकारी ---
राजेंद्र पाटील पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो नांदेड सापळा तपास अधिकारी नानासाहेब कदम
पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो नांदेड सापळा कारवाई पथक पोहेकॉ संतोष वच्चेवार सचिन गायकवाड पोकॉ अरशद खान चापोना मारोती सोनटक्के अँटी करप्शन ब्युरो यूनिट नांदेड यांनी सापळा यशस्वी केला आहे
नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम एजेंट यांनी कोणते ही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा असे आवाहन सदरच्या अधिकाऱ्यानी व कर्मचाऱ्यांनी केले आहे

0 Comments