Header Ads Widget

राज्याच्या राजकीय वर्तुळात माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या नावाची भावी आमदार म्हणून चर्चा असताना भाजपात दोन गट कशाला ?-

       माधव पवार
राज्यात भाजपाचे नेते मंडळी एकत्रितपणे काम करीत असताना ग्रामीण भागात म्हणजे नायगाव विधानसभा मतदार संघात भाजपात दोन गट असल्याचे स्पष्ट चित्र 
दिसून येत आहे

नुकतेच होटाळा येथे नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार विद्यमान प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थिती मध्ये जल जीवन मशीन अंतर्गत हर घर नल योजने अंतर्गत कामाचे भव्य उद्घाटन प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे 

यावेळी सदरच्या कार्यक्रमाला भाजपाचे श्रावण पाटील भिलवंडे बालाजी बच्चेवार शिवराज पाटील होटाळकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित होते परंतु नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान दोन आमदार राम पाटील रातोळीकर यांच्यासह राजेश पवार यांना निमंत्रित करण्यात आले ? नसल्याचे सांगण्यात येते

नायगाव विधानसभा मतदार संघात भाजपाचे दोन गट असल्यामुळे आमदार राजेश पवार व राम पाटील रातोळीकर यांचे बॅनरवर फोटो देखील लावण्यात आले नसल्याचे सांगण्यात येते राज्यातील राजकीय नेते मंडळी नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघाचा भावी आमदार म्हणून शिवराज पाटील होटाळकर यांच्या कडे पाहत आहेत

आगामी काळात सुद्धा भावी आमदार भाजपाचा होईल असे स्वप्न मतदार संघात पाहावायास मिळाले असले तरी भाजपात दोन गट असले तरी भावी आमदार म्हणून माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांच्या नावाची राजकीय वर्तुळासह जनतेत चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे 

नायगाव तालुक्यातील मौजे होटाळा येथे हर घर जल योजने अंतर्गत जल मिशन पाणी पुरवठा योजनेच्या एक कोटी २५ लाख  रुपयाच्या योजनेच्या कामाचा उदघाटन सोहळा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालाआहे

या कार्यक्रमाला भाजपाचे दोन आमदार राम पाटील रातोळीकर व नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांची अनुउपस्थिती का ? होती असं प्रश्न चर्चेला जात असला तरी भाजपातील गटबाजी पुन्हा एकदा जनतेला पाहावयास मिळाली आहे

Post a Comment

0 Comments