जिल्ह्यात असो की ग्रामीण भागात पोलिसांच्या
जुगार आड्यावर देशी दारू अड्डयावर गुटखा विक्री करणाऱ्यावर पान टपरी यांच्यावर धाडी पडत असतात तर मग मटक्यावर का ? बर पडत नाहीत असा सवाल जन सामान्य माणसातून उपस्थित केला असला तरी पोलीसाचे करावे तेवढे कौतुक कमीच असल्याचे बोलल्या जात आहे
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अवैध धंदे वाल्याच्या संदर्भात चांगला निर्णय घेत की अवैध धंद्याना कुठे तरी आळा बसावा म्हणून प्रयत्न करीत असले तरी जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यावर विना परवाना देशी दारू विकणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले असले तरी मटक्यावर का ? धाडी मारल्या जावू शकत नाहीत असा प्रश्न समोर येत आहे
ग्रामीण भागात देशी दारू पिणाऱ्याची संख्या ही मोठया प्रमाणात वाढली आणि दारूचा ही महापूर वाढला असल्यामुळे नूतन पिढी जास्तीची देशी दारूच्या आहारी गेल्यामुळे नव तरुण नशा बाजीत ग्रसला असल्याचे चित्र वास्तव पाहावयास मिळत असल्यामुळे बेवड्याच्या ही मुसक्या आवळने तेवढेच खरे असून पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांनी या कडे ही लक्ष देण्याची गरज आहे

0 Comments