नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे -
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यासह घरगुती मीटर धारका कडून विद्युत वितरण कंपनी उपविभाग नायगावच्या अंतर्गत असलेल्या मांजरम कुंटूर कृष्णूर नरसी या युनिट अंतर्गत गावामधून विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने व कंपनीने दर वर्षाला कोठ्यावधी रुपये वसूल करते परंतु या विभागाला स्वतःची इमारत शासकीय नसल्यामुळे आश्चर्य चकित करण्यात येत आहे
नायगाव नगरपंचायतसह विद्युत वितरण कंपनी नायगाव यांच्यात झालेल्या बिल भरण्याच्या कारणावरून वांदा ? आपसात मिटून घेण्या ऐवजी सदरच्या विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयास नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी बिले भरावे म्हणून ताळे ठोकले परंतु सदरचे कार्यालय बंद असल्यामुळे या विद्युत वितरण कंपनीच्या परिसरात व पटांगणात शुकशुकाट निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहेविद्युत वितरण कंपनीच्या समोर एक ही ग्राहक दिसत नसल्याचे वास्तव चित्र पाहवयास मिळत असले तरी सदरचे विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय कुठे गेले ? असा शोध बिल भरण्यासाठी गेलेल्या ग्राहकातून बोलल्या जात असले तरी शोधाशोध ही केली जात असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे
नायगावच्या नगरपंचायतकडे विद्युत वितरण कंपनीचे दोन कोटी सत्तर लाख रुपये थकबाकी असली तरी नगरपंचायतची सुद्धा थकबाकी विद्युत वितरण कंपनीकडे दहा लाख ९० हजार २७६ रुपये आहे
सदरच्या विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोकल्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही तरी मधला मार्ग काढून कार्यालय चालू ठेवण्या ऐवजी कुठे तरी स्थलांतरात करण्यात आल्याची माहिती मिळते आहे

0 Comments