नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे घुंगराळा येथील रहिवासी असलेले शंकर नारायण यमलवाड यांचे दोन दोन मुले पोलीस विभागात कार्यरत असताना सुद्धा माझ्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून पोलीस देत नसल्याल्याचा आरोप शंकर यम्मलवाड यांनी केला आहे
तालुक्यातील घुंगराळा गावचे रहिवासी असलो तरी कुंटूर तांडा येथे गट क्रमांक ६२९,६१२,६०९,६२४,६०७ असे आहेत आणि सदरची जमीन वडिलोपार्जित शेती हा व्यवसाय करत असल्यामुळे माझाच भाऊ यांनी मला व कुटूंबातील लोकांना जाणूनबुजून त्रास देत असल्यामुळे दिनांक १३ मार्च २०२३ रोजी ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन संबंधितावर गुन्हे दाखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे
सदर हरभऱ्याचे पीक माझ्या परस्पर काढून बे कायदेशिररित्या शेतात येऊन घेऊन गेले असल्यामुळे रात्रीच्या वेळी म्हणजे पाच वाजण्याच्या दरम्यान शेताकडे गेले असताना शेतातील हरभऱ्याचे पीक काढून नेल्याचे समजल्याने तसेच ज्वारी पिकाचे नुकसान केले त्याच बरोबर नुकसान झालेल्या पिकाचा व्हिडीओ करण्याचा प्रयत्न केला आहे
सदरच्या गैर अर्जदाराने चोरून नेला असल्याचा आरोप करीत फिर्यादीचे दोन मुल पोलीस विभागात कार्यरत असल्यामुळे ते बाहेर गावी आहेत एक सैन्यात तर दुसरा पोलीस मध्ये आहे
कुंटूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने बीट जमादार गीते यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले परंतु ह्या प्रकरणात कसल्याच प्रकारची कारवाई झाली नसल्याचे शंकर नारायण यमलवाड याने सांगितले असून सदरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी व बीट जमादाराने सदरच्या तक्रारीची नोंद घेऊन कारवाही करून मला न्याय मिळवून देण्याची अपेक्षा मी करीत आहे

0 Comments