Header Ads Widget

महाराष्ट्रातील नामांकित राष्ट्रीय पक्षाला नाकारून राजकीय पुढारी करत आहेत बी आर एस पक्षात प्रवेश - घर की मुर्गी दाल बराबर म्हण्याचे वेळ ? -

        माधव पवार 
तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात बी आर एस पक्षांचे रोपटे लावून पक्ष जोमाने वाढविण्यासाठी व चालविण्यासाठी प्रयत्न करीत आहे

राज्यातील असलेले नामांकित राष्ट्रीय पक्षाला नाकारून राजकीय पुढारी व जनता बी आर एस पक्षात प्रवेश घेण्यासाठी मोठी उत्सुकता दाखवित असल्यामुळे तेलंगणाचा पक्ष महाराष्ट्रात वाढविण्यासाठी येथील नेत्याची धावपळ मोठी चालू असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

महाराष्ट्र राज्यातील काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वंचित बहुजन आघाडी अशा नामांकित पक्षाला नाकारून या राज्यातील राजकीय नेते मंडळीसह पुढारी तेलंगणा राज्याचा नामांकित पक्ष असलेला बी आर एस पक्षात प्रवेश करत आहेत राज्यातील जनतेला मोठी उत्सुकता लागली असल्याने तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी प्रवेश देण्यासाठी मोठा आटापिटा करत असल्याचे चित्र ही दिसून येत आहे

राज्यातील नामांकित अशा राष्ट्रीय पक्षाला येथील पुढारी का ? ना करून तेलंगणाच्या पक्षात प्रवेश करीत आहेत यांचे आत्मचिंतन येथील राजकीय पक्षानी करण्याची गरज भासत असल्याचा असा प्रश्न चर्चेला जात असला तरी सदरचे "पक्ष घर की मुर्गी दाल बराबर " झाले की काय " असा प्रश्न जन सामान्य माणसाला भेडसावत आहे

नामांकित पक्ष असताना सुद्धा तेलंगणा राज्याच्या पक्षात म्हणजे बी आर एस पक्षात प्रवेश करीत असल्यामुळे स्थानिक पक्षाला चांगलीच खिंडार भविष्यात बसणार असल्याचे ही वास्तु चित्र दिसून येते सदरचे पुढारी सदरचा पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणार का ? असा ही प्रश्न चेर्चेचा विषय बनला आहे 

Post a Comment

0 Comments