Header Ads Widget

दोन कॅमेरा सोबत घेऊन प्रदर्शन करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडविने योग्यच - रवींद्र पाटील चव्हाण -

      माधव पवार
नायगाव विधानसभा मतदार संघात दोन कॅमेरे वाल्याना सोबत घेऊन विकासाविना प्रदर्शन करण्यापेक्षा जनसामाने माणसाचे प्रश्न सोडवणे योग्य असल्याचे नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार पुत्र प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

सध्याच्या परिस्थितीत नायगाव तालुक्यात विद्युत वितरण कंपनीच्या संदर्भातील व समस्यावर तोडगा काढण्यासाठी विद्युत वितरणच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याशी प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी चर्चा काल परवाच चर्चा केली आणि तात्काळ रुई बु येथील थोडक्यात दलित वस्तीचा प्रश्न मिटला आहे

नायगाव तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यात ट्रांसफार्मरच्या बाबतीत अनेक समस्या आहेत बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रश्न उद्भवल्या सारखी परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र पाहवयास मिळत असल्याने विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन सिंगल फेज ट्रांसफार्मर उपलब्ध करून द्यावे असे प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांनी सांगितले आहे 


Post a Comment

0 Comments