Header Ads Widget

नायगाव मतदार संघातील उन्हाळ्याची व पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने लवकर उपाय योजना कराव्यात माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर -

       माधव पवार - 
नायगाव विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील एकमेव मतदार संघ हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने नटला व थाटला असल्यामुळे या मतदार संघातील मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यानी तात्काळ उपाय योजना कराव्यात असे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी सांगितले आहे 
भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील यांनी नागरिकांचे व शेतकऱ्याचे  प्रश्न सोडविण्यासाठी सज्ज असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की विद्युत वितरण कंपनीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आडी अडचणी असो त्यावर मात करण्यासाठी सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे सध्याच्या परिस्थितीत उन्हाळ्याचे दोन महिने जवळपास संपत आले असले तरी अजून दोन महिने कडाक्याचे  आहेत प्रशासनानी नायगाव विधान सभा मतदार संघात कोणत्या ही खेड्यापाड्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून तात्काळ खबरदारी घेऊन ज्या ज्या गावात पाण्याची टंचाई आहे त्या गावात अधिग्रहण करणे गरजेचे असून शासनाने ग्रामपंचायत मार्फत प्रस्ताव लवकर मागून घेणे हे अतिशय महत्त्वाचे आहेनायगाव तालुक्यात विद्युत वितरण कंपनीच्या काही तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांना अनेक समस्याला सामोरे जावे लागत आहे

त्यावर काही तरी उपाय योजना म्हणून विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने ही लक्ष देऊन त्या ठिकाणच्या समस्या सोडविले पाहिजे असे ही माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी सांगितले असले असून सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या उन्हाळ्याची परिस्थिती असल्यामुळे नागरिकांना  मुबलक पाणी मिळण्यासाठी शासनाने तात्काळ उपाय योजना करावेत

Post a Comment

0 Comments