माधव पवार
नायगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे मुस्तापूर येथील रहिवासी असलेल्या एक महिला शेतात गेली असता तिला घरी येत असताना थोडा फार उशीर झाला असल्याचे सांगण्यात येते आहे
तीच संधी साधून याच गावातील एक तरुण शेतातुन घराकडे पोते घेऊन येत असलेल्या काशीराम लोने यांच्या शेताच्या जवळपास एका २५ वर्षाचा तरुण बेवड्यानी महिलेला आडवून दागिने चोरण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळते आहे
मुस्तापूर येथील आरोपी माधव इरबा गायकवाड यांनी त्या महिलेला वाटेत आडवले आणि तिच्या गळ्यातील दागिने व इतर दागिने घेऊन पळकडीत महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे नायगाव पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तालुक्यातील मुस्तापूरचा रहिवासी असलेल्या आरोपीने माहिलेची वाट अडवून तिच्या अंगावरील दागिने मनी मंगळसूत्र कानातील सोन्याची झुमके चोरून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु या महिलेने आरडा ओरड केल्याने शेजारच्या लोकांनी महिलेकडे धावून गेले सदरचा असलेला आरोपी माधव गायकवाड रंगेहात पकडून ठेवले आहे
सदरची घटना मुस्तापूर येथे घडली असून या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जय प्रकाश गुट्टे गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास फौजदार शिवकुमार बाचावार
आहे

0 Comments