नांदेड येथील पावडेवाडी रोडवरील विस्तारीत रामानंद नगर हाऊसिंग सोसायटी समितीच्या वतीने नविन व सुंदर असे श्री दत्त मंदिर बांधण्यात आले असून या मंदिरात श्री दत्तमुर्ती प्राणप्रतिष्ठापना.कलशारोहण व महाप्रसाद सोमवारी दि. २७ मार्च २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी भाविक भक्तानी उपस्थित राहाण्याचे अव्हान समिती तर्फे करण्यात आले आहे.
दिनांक २४ मार्च २०२३ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजता होमहवन व मंदिराची वास्तुशांती, दुपारी १.०० ते ३.०० वाजता महाप्रसाद वाटप करण्यात आले
तर दि,२४ ते २७ दररोज नित्य नियमाने कार्यक्रम होत आहेत.सोमवार दि. २७ मार्च रोजी सकाळी ९ ते १.३० वाजता पिंडीका पूजन, मूर्ती स्थापना मूर्ती तत्व भरणा, कलश पूजन, श्री पाचलेगांवकर महाराज मठ नांदेड येथील महंत गोविंद गुरु महाराज.व श्री दत्त संस्थान गुंज येथील ब्रम्हचर्य पं.पू कालीदास महाराज बोरीकर यांच्या हस्ते कलशारोहण होवून होमाची सांगता होणार आहे.
दुपारी २.३० वा. महाप्रसाद आयोजित केला असून
या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ ते २७ मार्च रोजी सकाळी सकाळी ८.०० ते १.०० वा. या वेळात देवतांची मिरवणूक, 'श्री' चे आगमन, गणपती पूजन, देवता , स्थापना, देवतांची वास्तुशांती, जलाधिवास, शय्याधिवास, दुपारी १.३० ते ३.०० वा. महाप्रसाद वाटप करण्यात आले.
तर श्री दत्तमुर्ती हि उभी पाच फुटांची आहे व हि मुर्ती आर्जुन आर्ट गँलरी जयपूर राजस्थान येते बनवून मिळाली तर या मुर्तीकारास राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे.
श्री दत्तमुर्ती हि अंदाजे ५ लक्ष रूपयेची असल्यामुळे सदरच्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री दत्त प्रतिष्ठान विस्तारीत रामानंद नगर नांदेडचे अध्यक्ष उदय कनजीकर.सचिव श्रीनिवास रमाकांत देशमुख काहाळेकर.कोषध्यक्ष गजानन चट्टे. सदस्य हाणमंत शिंदे.व विस्तारीत रामानंद नगर येथील नागरिक परिश्रम करत आहेत.
या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहुन श्री दत्तमुर्ती दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त प्रतिष्ठान विस्तारीत रामानंद नगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments