Header Ads Widget

मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन कर्मचार्‍याला लागू करण्याचे दिले आश्वासन परंतु शासन निर्णय नाही ? संप कऱ्या कर्मचार्‍यात प्रचंड नाराजी - टी जी रातोळीकर

        माधव पवार 
अख्ख्या राज्यातील विविध क्षेत्रातील कर्मचारी राज्याच्या संपावर दिनांक १४ मार्च २०२३ रोजी पासून बेमुदत संपावर गेली होते जुनी पेन्शन लागू करण्याच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन दिले आहे 

मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन शासन निर्णय ?  नसल्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यात प्रचंड नाराजी असल्याचे ग्रामसेवक संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष टी जी रातोळीकर संपकरी कर्मचाऱ्याच्या वतीने नाराजी व्यक्त केळी आहे 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सहा दिवसा पासून करण्यात आलेला बेमुदत संप हा मागे घेण्यासाठी व त्यांचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केले असून जुनी पेन्शन लागू करण्याच्या संदर्भात आश्वासन ही दिले परंतु ते आश्वासन शासन निर्णय ? नसल्यामुळे कर्मचाऱ्यात प्रचंड नाराजी असले तरी मुख्यमंत्र्याच्या आश्वासनाला दादा देऊन संपकरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे

जुने पेन्शन लागू करण्याच्या बाबतीत विविध क्षेत्रातील कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते सदरचा संप मागे घेण्यात आला असल्यामुळे दिनांक २१ मार्च २०२३ पासून सर्व शासकीय कर्मचारी आपापले कर्तव्य बजावणार असल्याचे सांगण्यात येते

या संपातील काही कर्मचारी समाधान असले तरी बऱ्याच पैकी कर्मचाऱ्यात नाराज असल्याचे स्पष्ट ग्राम सेवक संघटनेचे अध्यक्ष टी जी रातोळीकर यांनी स्पष्ट बोलून दाखविले असून विविध क्षेत्रातील कर्मचारी शासन दरबारी न्याय मागण्यास गेले आणि त्यांच्या पदरी निराशा पडली की काय ? अशी म्हणण्याची संप करी कर्मचाऱ्यावर आली असा ही प्रश्न चर्चेला जात आहे आहे 

Post a Comment

0 Comments