Header Ads Widget

आमदार व खासदाराच्या फुसक्या बारामुळे रुईची ७०० लोकांची दलित वस्ती दररोज अंधारात पाण्याचा प्रचंड त्रास - विद्युत वितरणच्या निष्क्रिय पणाचा कळस -

      माधव पवार
जिल्ह्यात विद्युत वितरण कंपनीच्या निष्क्रिय कार्यप्रणामुळे शेतकऱ्यासह जनतेत प्रचंड संताप व्यक्त केला जात असताना सुद्धा या विभागातुन निवडून गेलेले आमदार खासदार यांच्या फुसक्या बारामुळे कोणतीच कामे नीट व सरळ होण्याच्या मार्गांवर नसल्याचे जनतेतुन बोलल्या जात आहे

असा एक भाग म्हणून नायागांव तालुक्यातील रुई बु येथील  जवळ पास ७०० लोकांची दलित वस्ती ही दररोज अंधारात राहत असल्यामुळे नागरिकांचा पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे

नायगाव तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या निष्क्रिय व्यवस्थापणामुळे तालुक्यात विद्युत वितरण कंपनीच्या व्यस्थेवर शेतकरी व ग्राहक व नागरिक त्रस्त झाले आहे

विद्युत पुरवठा सुरळीत करणारे सिंगल फेजचे ट्रान्सफर निकृष्ट दर्जेचे आणून बसवित असल्यामुळे एका दिवसातच जळून खाक होत असल्यामुळे तालुक्यातील रुई बु ची दलित वस्ती ही दररोज अंधारात राहत असल्याचे वास्तव चित्र स्पष्ट दिसून येत आहे 

या भागातून निवडून गेलेले आमदार व खासदार अशा गंभीर बाबीकडे लक्ष देऊन विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जॉब विचारतील का ? असा प्रश्न दलित वस्तीतील नागरिकांनी केला केला असला तरी विद्युत वितरण कंपनीवरच आता घागर मोर्चा ? काढण्याच्या तयारीत आहेत 

Post a Comment

0 Comments