Header Ads Widget

महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी युनिट मांजरम अंतर्गत एक कोठी ३२ लाख थकबाकी वसुली २२ लाख रुपये तर कृष्णूर युनिटच्या बावीस गावांत एक कोठी ४२ लाख थकबाकी व २३ लाख वसुली !!

       माधव पवार 
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला नगदी पैसे देऊन शेतकऱ्यासाठी व नागरिकांसाठी खरेदी करावे लागते आणि शेतकऱ्यांच्या स्वावलंबनासाठी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावे लागत आहे

महावितरण कंपनी युनिट मांजरम अंतर्गत गावात १ कोठी ३२ लाख थकबाकी व २० लाख रुपये वसुली तरी कृष्णूर युनिट अंतर्गत १४२ लाख थकबाकी तर वसुली २३ लाख रुपये झाली तरी विद्युत वितरण कंपनीला विद्युत पुरवठा सुरळीत करावा लागत असल्याचे मांजरमचे सहाय्यक अभियंता पठाण व कृष्णूर युनिटचे ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितले आहे

महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी युनिट मांजरम अंतर्गत एक कोठी ३२ लाख थकबाकी वसुली २२ लाख रुपये तर कृष्णूर युनिटच्या बावीस गावांत एक कोठी ४२ लाख थकबाकी व २३ लाख वसुली झाली असली तरी मांजरम व कृष्णूर विद्युत वितरण युनिट अंतर्गत अध्याप ही २ कोठी ७४ लाख रुपये थकीत बाकी असल्यामुळे भरण्यात यावे असे दोन्ही युनिटच्या सहाय्यक अभियंत्यानी आवाहन केले आहे 

राज्यातील शेतकरी असो की ग्रामीण भागातील शेतकरी असो त्यांच्या कडील फक्त बाकी असलेली वेळेवर भरत नसल्यामुळे कृष्णुर युनिट अंतर्गत गावातील एक करोड ४२ लाख रुपये थक बाकी असून त्या पैकी २३ लाख रुपये केवळ वसुली झाली असल्याने विद्युत वितरण कंपनी मोठ्या तोठ्यात आल्याची माहिती सहाय्यक अभियंता युनिट कृष्णूर यांनी दिली आहे

राज्यातील व ग्रामीण भागातील विद्युत वितरण कंपनीच्या बाबतीत जर अभ्यास करून पाहिला तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ही ७५ टक्के तोट्यात असून यात पंचवीस टक्के सुद्धा वसुली वेळेवर होत नसल्यामुळे अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना शेतकऱ्याकडे व घरगुती मीटर धारकाकडे अनेक वेळा फिरावे लागत असून जास्तीत जास्त घरगुती मीटर धारकांनी मीटर घ्यावेत असे ही आवाहन करण्यात येत आहे 

Post a Comment

0 Comments