Header Ads Widget

हिमायतनगर पोलिसांचा शहरात रामनवमी व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी काढला रूट मार्च !!


हिमायतनगर प्रतिनिधी : नागोराव शिंदे - 

शहरात येणाऱ्या काही दिवसात होत असलेल्या रामनवमी व रमजान ईद या सणांमध्ये कुठल्याही प्रकारे जातीय तेढ निर्माण होणार नाही यासाठी हिमायतनगर पोलीस प्रशासनाकडून शहरात शांतता संदर्भात दिनांक २८ मार्च २०२३ रोजी रूट मार्च काढून शहरातील जनतेला व नागरीकांना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन यावेळी  करण्यात आले आहेयाबाबत सविस्तर वृत्त असे की राम नवमी व रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक व भोकर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २८ मार्च २०२३ रोजी रूट मार्च काढण्यात आला आहे हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनुर यांचे उपस्थितीत आज शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक  रूट मार्च काढून शहरातील नागरिकांना धार्मिक सण व उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून नागरिकांनी शांततेत सण साजरे करण्याचे आव्हान शहरातील नागरिकांना केले आहे. 

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, अशोक सिंगनवाड  कुलकर्णी सह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments