Header Ads Widget

घुंगराळा येथे शौचालयास बसलेल्या दिंगाबर कासराळे यांचा अज्ञात वहानाच्या धडकेत मृत्यू - कुंटूर पोलीस घटनास्थळी दाखल !!

       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या घुंगराळा येथे दिनांक ३ मार्च २०२३ रोजी पहाटे अंदाज चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूलच्या जवळपास एक पूल असून या पुलावर दिगंबर कासराळे शौचालयास बसले असता कोणत्या तरी अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू  झाला आहे

घुंगराळा येथे दिनांक ३ मार्च २०२३ रोजी दुपारी २ वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, एक बहीण,पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, पुतणे असा त्यांचा परिवार आहे 
अशी माहिती कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी दिली असून सदरची घटना कळताच कुंटूर पोलीस 
घटनास्थळी रवाना झाले आहेततालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलेले घटना ही अतिशय दुखत घटना घडली असून मयत दिगंबर नागन कासराळे वय ४५ वर्ष राहणार घुंगराळा यांनी पाहाटेच्या सुमारास शौचालयास केला होता असा अंदाज कुंटूर पोलिसांनी व्यक्त केला असून इतर लोकांच्या चर्चेनुसार नेमके काय झाले असावे असा ही प्रश्न चर्चेला जात आहे कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे घुंगराळा येथील रहिवासी असलेला दिगंबर नागण कासराळे हा ऑटो चालक म्हणून सर्वत्र परिचयाचा होता गेल्या अनेक वर्षापासून जनसामान्य माणसात वावरत असताना त्यांची एक प्रकारची समाजात नावलौकिक अशी ओळख होती

घुंगराळा येथील मयत दिंगाबर कासराळे यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळद व्यक्त करण्यात येत असून सदरील अपघातातील घटनेचा कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार संतोष कुमरे यांच्यासह कंधारे, पोलीस जिप चालक यांनी घटनेचा पंचनामा केला प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेनासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले आहेत 


Post a Comment

0 Comments