राज्यस्तरीय आठ संस्थां मार्फत हरभरा खरेदी होणार असल्याचे शासनाने सांगितले व तशा पद्धतीची नोंदणी शेतकऱ्यांनी करावी असे आवाहन ही शासनाच्या वतीने करण्यात आले आहे नांदेड जिल्ह्यात चार संस्थां मार्फत जवळपास ६० प्रस्ताव नाफेड मार्फत खरेदी करण्याचे प्रस्ताव गेले असे बालाजी बच्चेवार यांनी सांगितले आहे
अद्याप तरी जवळपास ६० प्रस्तावा पैकी एक ही खरेदी केंद्र सुरू करण्यास नाफेडने मान्यता दिलेली नसल्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास येत असून शासनाचा हरभऱ्याचा हमी भाव पाच तीनशे ३५ रुपये असून बाजार पेठेत चना चार ५०० रुपये वावाने व २ ते ३ किलो कट्टी लावल्या जात आहे
यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून या संदर्भात भाजपाचे जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना बोलून घेऊन तात्काळ खरेदी केंद्र सुरू करावी अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आलेले आहेत
नाफेडचे ब्रँच मॅनेजर मुंबई यांना ही नांदेड जिल्ह्यातील सर्वच प्रस्तावाना तात्काळ मान्यता देऊन नाफेड मार्फत खरेदी केंद्रे सुरू करावी अशा पद्धतीचे निर्देश खासदार चिखलीकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे
नाफेडने तात्काळ हरभऱ्याची हमीभावाने खरेदी सुरू करून शेतकऱ्यांची लूट थांबवावी शेतकऱ्यांनी घाई न करता नाफेड मार्फत हरभरा खरेदी होणार असल्यामुळे हमी दरा नुसारच आपला हरभरा विकावा असे आव्हान महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केले आहे

0 Comments