नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या व आगामी काळातील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्षाची टीम अतिशय महत्त्वाची कामगिरी व कर्तव्य बजावत असल्यामुळे दिनांक ११ मार्च २०२३ रोजी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाखाली
जिल्ह्याचे भाजपाचे खासदार विद्यमान प्रताप पाटील चिखलीकर यांनी पक्षश्रेष्ठीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आपापल्या भाजप नेत्याच्या व पुढार्यांच्या माध्यमातून विशेष बैठका घेण्याचे सुचविल्याचे सांगण्यात येते आहे
त्यानुसार मार्गदर्शक म्हणून शिवराज पाटील होटाळकर जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड व माजी शिक्षण सभापती यांनी विशेष बैठकीचे आयोजन करत असून सदरच्या बैठकीसाठी व पक्षाला बळ देण्यासाठी नायगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे पुढारी विशेष लक्ष देत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे उमरी येथे अल्पकालीन विस्तारक प्रशिक्षण वर्ग पार पडले या प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शक शिवराज पाटील होटाळकर जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड श्रावण पाटील भिलवंडे जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड लक्ष्मण ठक्करवाड जिल्हा सरचिटणीस तथा बुथ अभियान संयोजक यांचा उपस्थितीत बैठक पार पडली आहे
या महत्वपूर्ण बैठकीच्या विशेष प्रसंगी सुधाकर देशमुख तालुका अध्यक्ष उमरी गजानन श्रीरामवार शहराध्यक्ष उमरी अमोल पाटील ढगे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष शंकर पाटील सावंत, देविदास पटणे,रमेश शिंदे, गजानन मनूरकर, दत्ता जाधव, आकाश सैदमवार, गंगाधर थेटे, रमेश जाधव, दादाराव जाधव, गोपीराज बेलकर देवानंद वडजे, अनिल धानोरकर, उपस्थित होते

0 Comments