Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील खंडगाव बेंद्री येथे साठ लाख रुपयाच्या जल जीवन मिशन योजच्या विकास कामाचे मा. शिवराज पाटील होटाळकर यांच्या शुभ हस्ते कामाचे नारळ फुटले !!

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील खांडगाव बेंद्री येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस  नांदेड तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शिवराज पाटील होटाळकर यांच्या शुभहस्ते दिनांक २५ मार्च २०२३ रोजी जल जीवन मिशन अंतर्गत एकंदरीतu ६० लाख रुपयाच्या पाणी पुरवठ्यांचे उद्घाटन करण्यात आले असून सदरच्या गावाला या योजनेच्या माध्यमातून मुबलक पाणी मिळणार असल्याची आशा होटाळकर यांनी व्यक्त केली आहे
तालुक्यातील खांडगाव बेंद्री येथे सदरच्या विकास कामाचे नारळ फोडून या गावाला चांगलीच विकासाची चालना मिळाली असल्याची भावना व्यक्त करीत ते म्हणाले की शासनाच्या माध्यमातून या खंडगाव बेंद्री एकंदरीत साठ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्यामुळे त्या निधीचा योग्य वापर सदरची ग्रामपंचायत करेल असा विश्वास ही माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळाकर यांनी व्यक्त केला आहे

खंडगाव बेंद्री येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीच्या भूमिपूजन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे  सरचिटणीस नांदेड शिवराज पाटील होटाळकर यांच्या विशेष उपस्थित मध्ये सदरच्या विकास कामाचे नारळ करण्यात आले

 खंडगाव बेंद्री ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने  सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावचे सरपंच प्रतिनिधी आनंदराव पाटील डुमणे प्रताप पाटील कदम, राम पाटील कदम, गंगाजी पाटील मुगावकर, दत्ता पाटील कदम, साहेबराव पाटील कदम, समस्त गावकरी मंडळी खंडगाव यावेळी उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments