माधव पवार / नागोराव शिंदे
महावितरणच्या यंत्रणेत सर्वात शेवटचा आणि ग्राहकांशी जोडलेल्या एकनिष्ठ घटकाचा म्हणून लाईनमनला यापुढे अधिक सन्मान मिळणार असल्यामुळे दिनांक ४ मार्च २०२३ देशभरातील लाईनमना बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात लाईनमन दिवस साजरा करण्याच्या बाबतीत सर्व सार्वजनिक व खासगी विद्युत क्षेत्रातील व्यवस्थापनांना सुचना केल्या आहे
त्या अनुषंगाने दिनांक ४ मार्च २०२४ रोजी महावितरण मध्ये लाईनमन दिवस साजरा करण्यात आला त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते उन्हाळा पावसाळा हिवाळा अशा तिन्ही ऋतूमध्ये काम करणाऱ्या लाईन मनाचा मोठा सन्मान करण्यात आला आहे जनमित्र म्हणजेच लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक असल्यामुळे महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस तसेच इतरही अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा चोवीस तास सुरळीत ठेवण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते अशा लाईननाच्या दीना निमित्त त्यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त
या दिवसाचे आयोजन करण्यात आले आहेमहावितरणच्या राज्य भरातील प्रादेशिक व परिमंडळ स्तरावर आयोजित मुख्य कार्यक्रमात नियमित व बाह्यस्त्रोत महिला व पुरुष लाईनमनचा प्रादेशिक संचालक व मुख्य अभियंता यांच्या हस्ते गौरव करण्यात आला असून ग्रामीण भागात विभाग कार्यालयाचे कार्यक्षेत्र विस्तारलेले व दुर्गम असलेल्या अशा विभागांतील उपविभाग कार्यालय किंवा अतिदुर्गम शाखा कार्यालयांमध्ये स्वतंत्रपणे लाईनमन दिवसाचे आयोजन करण्यात आले होते
वीज सुरक्षेची शपथ देऊन वीज सुरक्षे बाबत प्रबोधन करण्यात आले या दिनाच्या निमित्ताने महिला व पुरुष लाईनमन यांचे अनुभव कथन होऊन त्यात त्यांचा मोठा
सन्मान करण्यात आला राज्यात विविध स्तरावर ४ मार्च रोजी होणाऱ्या या लाईनमन दिवस कार्यक्रमास नियमित व बाहयस्त्रोत अशा सर्व महिला व पुरुष जनमित्रांनी सहभाग नोंदवून महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचा सन्मान करण्यात आला आहे

0 Comments