राज्यातील खासदारासह आमदाराचे पेन्शन बंद करून या राज्यातील तरुण-तरुणीला शासकीय सेवेत नोकऱ्या देऊन त्यांना दर महिन्याला हा २० हजार रुपये देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन नायगाव चे तहसीलदार गजानन शिंदे यांना दिनांक १७ मार्च २०२३ रोजी सुशिक्षित बेकार तरुण वर्गानी दिले आहे
महाराष्ट्र राज्यात सुशिक्षित बेकार रोजगारांची संख्या दीड कोटीच्या वर असताना सुद्धा या गंभीर बाबीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील सुशिक्षित बेकार तरुणांनी नायगाव च्या तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे
नायगाव तालुक्यासह राज्य भरात अंदाजे एक ते दीड कोटी तरुण व तरुणी सुशिक्षित बेकार असल्यामुळे सरकारने या तरुण वर्गांची दखल घेऊन शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न करावे हे सदरचे तरुण तरुणी दर महिन्याला वीस हजार रुपये पगारात शासकीय नोकऱ्या करण्यासाठी तयार असल्याने शासनाने तातडीने लक्ष घालून शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे असे या मागणीचे स्वरूप आहे
नायगाव चे तहसीलदार गजानन शिंदे यांना दिलेल्या निवेदनात सुशिक्षित भिकार तरुणाच्या प्रमुख मागण्या जुनी पेन्शन
योजना लागू करण्यात येऊ नये आमदार खासदार यांच्या पेन्शन बंद करण्यात यावे दीड कोटी तरुण तरुणीना महिना तीस हजार रुपये प्रमाणे नोकरीवर घ्यावें विना पेन्शन नोकरी करण्यास तयार आहेत
संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ नोकरी वरून काढुन नवीन कर्मचारी नियुक्त करणे निवेदन कर्ते रामदास दिगंबर पाटील भाकरे,गडगेकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातं म्हटले आले

0 Comments