राज्यात सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसह विधानसभेच्या निवडणुका लवकरच लागणार की काय ? असा प्रश्न चर्चेला जात असून दिल्लीत मारल्या जाणाऱ्या गप्पा आता गल्ली गल्लीत रंगायला लागल्या चर्चा राव असे चित्र स्पष्ट ऐकावयास मिळत असून आघामी काळातील निवडणुकीच्या चर्चेला ग्रामीण भागात चांगलाच ऊत आला असल्याचे जनसामान्याच्या चर्चेतून ऐकावयास मिळत आहे
राज्यासह दिल्लीत राजकीय नेते मंडळी कडून जागा वाटपाची चुणूक निघतात ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात रिकाम टवळ्या लोकांतून चर्चेला पूर्णविराम देण्या ऐवजी सदरच्या जागा वाटपाची चर्चा गल्ली बोळीत होताना ऐकावयास मिळत आहे
राज्यातले राजकारण पाहिले तर गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा म्हणण्याची ही वेळ जनसामान्य माणसातून चर्चेला अशा पद्धतीचे हे उधाण आले असून राज्यातील सध्याची परिस्थिती पाहिली तर निवडणुका घेतल्याशिवाय पर्याय नाही अशाही चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
राज्यातील सत्ता संघर्षाचा विषय अतिशय टोकाला गेले असल्याने फक्त केवळ आगामी काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये या राज्यातील राजकीय नेते या निवडणुकीच्या संदर्भातच बोलतात परंतु अनेक महिन्यापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित असताना सुद्धा यावर निवडणूक आयोग व राजकीय नेते मंडळी काहीच बोलत नसल्यामुळे आजच्या घडीला जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे सभापती कार्यालय वाऱ्यावर आहेत

0 Comments