सुजलेगाव प्रतिनिधी : दिगंबर मुदखेडे -
नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथिल हनुमान मंदिराच्या भव्य पटांगणात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक ३० मार्च ते दिनांक ७ एप्रिल २०२३ पर्यंत रामनवमी व हनुमान जन्मोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे
व करुणाष्टक प्रवचनकार वेदशास्त्रसंपन्न श्री ज्ञानेश्वर महाराज लाटकर यांचे व तसेच बाल कलाकाराच्या सहभाग घेऊन भव्य दिव्या अशा गावकऱ्यानी आयोजन केले आहे
गावामध्ये आनंद नगरीत रंगरंगोटी करून सुंदर प्रकारे गाथा भजनाच्या रूपात पालखी व भक्तिमय वातावरणात मिरवणुकीत कढली जाते पुढील कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अखंड हरिनाम सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पाहटे ४ ते ६ काकडा ६ ते ७ विष्णुसहस्त्रनाम ७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण १० ते १ गाथा भजन दुपारी ५ ते ७ हरिपाठ ९ ते ११ हरिजागर किर्तन . दि ३० मार्च रोजी ठीक सकाळी,९ ते १२ ह.भ.प. दिगंबर जाधव याचे रामजन्मोत्सव किर्तन सायंकाळी कीर्तनकार हरिभक्त --
परायण ज्ञानेश्वर महाराज नांदेडकर यांचे कीर्तन दि ३१ मार्च रोजी. सायंकाळी ९ ते ११ बाल कीर्तनकार . ह.भ.प. गुणगुण दीदी मलकापूरकर, १ एप्रिल हरिभक्त परायण सतीश महाराज लिंगापूरकर, २ एप्रिल हरिभक्त परायण गणपतराव देगावे सर ईकळी मोर ३ एप्रिल हरिभक्त परायण वासुदेव महाराज कोलंबीकर ४ एप्रिल ह.भ.प. परमेश्वर महाराज महाराज औराळकर दि ५ ----
रोजी.सायंकाळी ९ ते ११ किर्तन ह.भ.प. बाबू महाराज कुदळेकर 6 एप्रिल रोजी.यांचे हनुमान जन्मोत्सव किर्तन सकाळी ५ ते ७ व महा रक्तदान व आरोग्य शिबीर तपासणी दुपारी ५ ते ८ महाप्रसाद, सायंकाळी ९ ते ११ किर्तन ह.भ.प. व्यंकटराव महाराज एकलारकर ३ एप्रिल रोजी.सकाळी ९ ते १२ हरिभक्त परायण डॉ.दिगंबर महाराज गडगेकर यांचे काल्याचे किर्तन महाप्रसाद व सायंकाळी ५ ते ६ वाघाचा कार्यक्रम व - -
त्याच प्रमाणे सायंकाळी ८ ते ११ रात्री शाहीर दिगु तुमवाड यांचा संच व कलाकार शाहिरी व मनोरंजन कार्यक्रम होणार असून सप्ताहात दररोज महाप्रसाद होणार आहे तरी परिसरातील भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावे कार्यक्रमाचे आयोजन श्री संतोष महाराज देशमुख सुजलेगावकर यांनी केले आहे असे आवाहन समस्त गावकरी मंडळ श्री महारुद्र हनुमान मंदिर ट्रस्ट सुजलेगाव याच्या वतीने करण्यात आले आहे....

0 Comments