Header Ads Widget

धर्माबाद तालुक्यातील मौ चिकना तालुका धर्माबाद येथे १२८ मनुष्याचा पहारा अखंड दत्तनाम सप्ताहा मोठ्या उत्साहात सोहळा थाटात संपन्न गजानन पाटील चव्हाण यांची माहिती !!

           माधव पवार
धर्माबाद तालुक्यातील मौजे चिखना येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिनांक २९ मार्च २०२३ रोजी भव्य दिव्य अशा कार्यक्रमांचे समस्त गावकऱ्यांच्या वतीने आयोजन करण्यात आले या सदरच्या कार्यक्रमाला साधू संतांची व महंताची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती अशी माहिती  भाजपा पक्षाचे युवा नेतृत्व असलेले गजानन पाटील चव्हाण यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
तालुक्यातील मौजे चिकना आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य पालखी मिरवणूक सोहळ्याच्या दरम्यान पंढरपूर सारखे मोठे विठ्ठलाचे सौरभ दिसून आले आणि सांगता मिती चै. शु. ० ९ शके १९४५ दिनांक ३० मार्च २०२३  पहाटे चार वाजता सव्वाखंडी तांदुळाची पूजा आरती व काकडा करण्यात आला व सदरचा कार्यक्रम मोठ्या थाटात व उत्साहाने समाप्तीने संपन्न करण्यात आला आहे 

सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमची रूपरेषा याप्रमाणे दिनांक २२ २०२३  रोजी पासून द.भ.प. प्रसिद्ध संत कीर्तनकार व प्रवचनकार यांच्या अमृत वाणीतून सोहळ्यास प्रारंभ करण्यात आले  
श्री प्रसाद चंद्र ढाणकीकर, राजाराम पातोंडीकर, 
गणेश पा कदम येल्लापूरकर शिवाजी शिंदे टाकळीकर गणेश खानसोळे शिखाचीवाडी, रमेश माऊलीकर रावसाहेब हिवराळे कावलगुडा, रुद्रगीर महाराज किवळेकर खंडू खंनसोळे शिखाचीवाडी, भगवान गिरी महाराज बरडशेवाळा, अमोल पेशंटवार दरेगाववाडी संतोषपुरी महाराज चोळाखा पंढरीनाथ भोंगगुरुजी शंभरगाव नारायणगिरी महाराज वडगुंफा व्यंकट स्वामी महाराज पिंपळगाव तसेच पुजारी श्री हरीगिरी महाराज
अशा सर्व संत महात्म्यांच्या कीर्तन व प्रवचनामधून 
स्वस्ती श्री कल्याण सुख आनंद धन दत्त चरणी ठेवून मन रात्र दिवस भजावे दत्तकृपे आमचे मनी नाम स्मरावे अष्ट विश्रांती मनुष्याची प्रत्येक प्रहरी भजावे तरी तुम्ही भक्त जण करावया नामस्मरण चिकना मुकामी येऊन सावध भजनी असावे या संतवाणी प्रमाणे पद अभंग प्रमाणे
नांदेड जिल्ह्यासह हिंगोली लातूर परभणी यवतमाळ अशा या चारही जिल्ह्यातून सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थिती ठेवून नामस्मरण केले आहे तसेच नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी दत्त मंदिर मठ स्थापन करण्यासाठी अकरा लाख रुपये निधी देण्याचे सांगितले आहे

सतत आठ दिवसापासून सरास दहा ते वीस हजार भक्तांनी महाप्रसादाचा दररोज प्रसाद घेतला असून हा सर्व सोहळा कार्यक्रमाचे आयोजक श्री संत नारायण गिरी गुरु बाळगीर महाराज मठ संस्थान वडगुंफा माहूर व गाडीपुरा नांदेड व मोजे चिकना समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने आयोजन नियोजन करण्यात आले होते

नांदेड जिल्ह्यातील अन्नदाते व समस्त मोजे चिकना येतील गावकरी मंडळी अहो रात्र मेहनत घेऊन हा भव्य दिव्य सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न होण्यासाठी मेहनत घेतली आहे

Post a Comment

0 Comments