नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे -
नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर अर्जपूर बिलोली दौऱ्यावर असताना अचानक नाफेड मार्फत चना खरेदी केंद्रास भेट दिली आहे
यावेळी कॉन्टेस्ट प्रोडूसर कंपनीचे संचालक भागवत लोकमनवार यांनी खरेदी केंद्रावर आज पर्यंत चालू असलेल्या खरेदीची माहिती व शेतकऱ्यांनी आजपर्यंत नोंदणी केलेली माहिती खासदार चिखलीकर यांनी दिली यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी ही उपस्थित होते
शेतकऱ्यांचा चना खरेदी विना विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले
खासदार चिखलीकर यांनी कॉन्टिस्ट प्रोडूसर कंपनी मार्फत चालू असलेल्या कामावर समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर काटा होईल व चांगली सुविधा उपलब्ध होईल यासाठी आपण प्रयत्न करावा व काही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करावा असे ही सांगितले आहे
यावेळी परिसरातील शेतकरी हमाल मापाडी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. खासदार चिखलीकर साहेबांसोबत आमदार राम पाटील रातोळीकर माजी आमदार सुभाषराव साबणे भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य बालाजी बच्चेवार जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे आदी मान्यवर उपस्थित होते

0 Comments