पंजाबराव डक यांनी दिनांक १३ ते २० मार्च रोजी पाऊस पडणार असल्याचा हवामान अंदाज दर्शविल्यामुळे शेतकऱ्यासह वीटभट्टी धारक पावसांच्या भीतीने चांगलेच हैराण होत आहेत
शेतकरी मोठया प्रमाणात हैराण होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत असून सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात टाळकी हरभरा गहू असे पिके आहेत तर गोदाकाठी वीट भट्टी धारक थाटलेल्या वीट भट्टीचे व तयार केलेल्या विटाचे नुकसान होईल अशी भीती वीट भट्टी धारकाना वाटत आहे
नायगाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतात हरभरा टाळक्या गहू आदी पिके शेतात आहेत याच भागात लाखो रुपये खर्च करून वीट भट्या टाकल्या आहेत
वीट भट्या धारक व शेतकरी अगोदरच नुकसानी खाईत सापडले असताना पंजाबराव डक यांनी वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असल्यामुळे शेतकरी राजा गहू व हरभरा पावसाच्या भीतीने शेतकरी फाऱ्या झाकून घेत आहेत

0 Comments