नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघ हे एक आगळ्या वेगळ्या या मतदार संघाची म्हणून ओळख आहे या मतदार संघात मोठ मोठाले धन्यदांडगे नेते मंडळी या मतदारसंघाची विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आत्ता पासूनच जोरदार तयारी करत आहेत
या विधानसभा मतदार संघात माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना सोशल मीडियावर दिसून येत आहे
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार हे चालू आमदार असताना सुद्धा या मतदार संघात नामांकित पुढारी निवडणुकीच्या रिंगणात दंड मारण्याच्या तयारीत आहेत या नामांकित पुढाऱ्यांची विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात चर्चेला विशाल उधान आले आहे
भाजपा पक्षांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षांचे नांदेड जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या नावाची दमदार चर्चा रंगायला लागली आहे
काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांच्यासह शेतकरी नेते कवळे गुरुजी हे भावी आमदार म्हणून चर्चेत असल्यामुळे नायगाव मतदार संघात भावी आमदारांची चाचणी आता जनतेतून करण्यात येत ? आहे
नायगाव विधानसभा मतदार संघातील वास्तव चित्र पाहायला मिळत असले तरी प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण शिवराज पाटील होटाळकर कवळे गुरुजी यांच्या नावाची भावी आमदार म्हणून चर्चा होताना दिसत आहे

0 Comments