Header Ads Widget

विद्युत वितरण कंपनीची थकबाकी नगरपंचायत कडे असताना नगरपंचायतने विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयास का मारली शिल ? गजानन पाटील चव्हाण

       माधव पवार
नायगाव बाजार शहरातील पाणी पुरवठा व दिवाबत्तीची थकबाकी दोन कोटी ७० लाख थकीत असताना नायगाव नगरपंचायतच्या अधिकाऱ्यानी विचाराच्या पलीकडे जाऊन वीज मंडळाच्या कार्यालयाच्या किरायाचे येणे बाकी असल्यामुळे नगरपंचायतने कुलूप ठोकल्याचा प्रकार घडवून आणला असला तरी महावितरण कंपनीकडे नगरपंचायतचे एकूण दहा लाख ९० हाजार २७६ रुपयासाठी सील ठोकली आहे 

शहर अंधारात बुडाले की काय ? प्रश्न चर्चाला जात असताना कदाचित अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्या होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे गजानन चव्हाण यांचे म्हणे असल्यामुळे शहरातील भर उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईच्या तसेच मुस्लिम बांधवांच्या पवित्र महिन्यामध्ये अर्थात रमजान महिना चालू झाला असल्यामुळे या समस्या सामोरे जावे लागते काय असा प्रश्न उपस्थित केला आहे

नायगाव बाजार शहरातील विज महावितरण कार्यालय नरसी येथे स्थलांतर झाले असून यास कोण जबाबदार ? असा प्रश्न नायगाव शहरासह तालुक्यातील लोकांना वीज पडला असला तरी विज बिल भरण्यासाठी व ईतर कामासाठी जनतेच्या विविध अडी अडचणीवर मात करण्यासाठी नागरिकांना अनेक समस्याना सामोरे भविष्यात जावे लागणार असल्याचे मत गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांनी व्यक्त केले आहे

Post a Comment

0 Comments