महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांची मालेगावात दिनांक २६ मार्च २०२३ रोजी संध्यकाळी ठीक ५ वाजण्याच्या दरम्यान विराट जाहीर सभा असल्यामुळे या सदरच्या सभेसाठी लाखोंच्या संख्येने शिवसैनिक जाणार असल्याची माहिती मिळत असून सदरची सभा ही तुफानी गाजणार असल्यामुळे या विराट सभेकडे राज्याचेच नव्हे तर अख्या देशाचे लक्ष या विराट सभेकडे असणार आहे
राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी झाल्याच्या नंतर या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली होती लगातार अडीच वर्षे कोरोना महामारीच्या काळात अतिशय महाराष्ट्र राज्याच्या जनतेला सांभाळून कोरोना महामारीचा सामना केला अशा महान नेतृत्वाची म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मालेगावात विराट जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख यांच्या विराट सभेसाठी जोरदार आणि दमदार तयारी चालू करण्यात आली असून या विराट सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असल्यामुळे सदरच्या विराट सभेसाठी लाखो शिवसैनिक नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव येथे विराट सभेसाठी जाणार असल्याची माहिती सूत्रानी दिली असून या विराट सभेत अनेकांचे भिंग फुटण्याची शक्यता आहे

0 Comments