नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे -
व्हॉइस ऑफ मीडियाच्या नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष पदी बाळासाहेब पांडे मांजरमकर,जिल्हा उपाध्यक्ष (दक्षिण पदी अनिल धमने जिल्हा संघटक दक्षिण पदी एस. एम. मुदखेडकर,जिल्हा सदस्य दक्षिण पदी बालाजी नागठाणे यांची निवड करण्यात आली आहे.
व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या सुचने नुसार जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले व महानगराध्यक्ष डाँ गणेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे
नायगाव भागात पत्रकारिता क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत असलेले जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे मांजरमकर यांची वॊईस ऑफ मीडियाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे
त्यांच्या नेत्रत्वात अनेक पत्रकार बांधवांनी वॊईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेत आल्याने नायगाव च्या पत्रकाराचा मोठा ग्रुप या संघटनेकडे जोडला गेला आहे.
जिल्हा उपाध्यक्ष (दक्षिण) म्हणून अनिल धमने, एस. एम. मुदखेडकर यांची(दक्षिण) जिल्हा संघटक म्हणून तर जिल्हा का. सदस्य म्हणून बालाजी नागठाणे,शरद काटकर,प्रसिद्धी प्रमुख पदी श्रीधर नागापूरकर, यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीचे सर्व पत्रकार बांधवाच्या वतीने व सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

0 Comments