Header Ads Widget

माळाकोळी पोलीस ठाण्याचे कर्तव्यद दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी आरोपीला म्हैस टेम्पोमध्ये चोरून नेताना रंगे हात पकडले

       माधव पवार
माळाकोळी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार यांनी नांदेड जिल्ह्यचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक
अभिनाश कुमार,उप विभागीय पोलीस आधिकारी कंधार मारोती थोरात यांचे सुचने नुसार आरोपी यांनी संगणमत करून सदरची म्हैस चोरून घेऊन जात सपोनि संजय निलपत्रेवार यांनी ३ लाख तेरा हजार रुपयाच्या मुद्देमाल आरोपीसह ताब्यात घेतले आहे

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष  तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा नांदेड येथील वजीराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत असताना गुन्हेगाराचा गर्दन काळ ठरलेले व लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलीस ठाण्यात सध्याच्या परिस्थितीत कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार यांनी टेम्पोमध्ये म्हैस चोरून घेऊन जात असताना सदरचा टेम्पो पकडून टेम्पो व म्हैस ताब्यात घेतले तर सदरच्या आरोपीला जेरबंद केले आहे 


माळाकोळी पोलिसांना संशय आल्याने सदर गाडी थांबवून चौकशी केली असता सदर टाटा एस टॅम्पो मधील म्हैस ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून सदर गुन्ह्यातील फिर्यादी यास बोलावून त्याबाबत खात्री केली आहे 

माळाकोळी पोलीस ठाण्यात गु.र.नं.३७ / २०२३ कलम ३७९ ३४ भा.द.वी प्रमाणे फिर्यादी एकनाथ शंकर चव्हाण वय ४० वर्षे व्यवसाय शेती राहणार हिराबोरीतांडा तालुका लोहा जिल्हा नांदेड यांनी तक्रार दिल्या वरुन ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

आरोपी (१ ) माधव आनंदराव देवकते राहणार कोष्टवाडी आरोपी ( २ ) लवकुश प्रभू राठोड राहणार भिल्लूतांडा ( ३ ) खाटीक फेरोज बाबू कुरेशी राहणार पालम (४ ) ज्ञानेश्वर रामचंद्र फुगणार राहणार रिसनगाव यांनी दिनांक ३० मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजण्याची दरम्यान मौजे लांडगेवाडी हायवेवर म्हैस चोरून नेताना सपोनि आरोपीला जेरबंद केले आहे 

यातील आरोपी यांनी संगणमत करून सदरची म्हैस चोरून घेऊन जात असताना पोलिसांना संशय आल्याने सदर गाडी थांबवून चौकशी केली असता सदर टाटा एस टॅम्पो मधील म्हैस ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून सदर गुन्ह्यातील फिर्यादी यास बोलावून त्याबाबत खात्री केली असता फिर्यादीने स्वतःचीच म्हैस असल्याचे सांगितले आरोपी कडून एकूण ३ लाख ,तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती ठाण्याचे सपोनि संजय निलपत्रेवार यांनी दिली आहे


 


Post a Comment

0 Comments