Header Ads Widget

जीवन विकास प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा !!

      गोविंद नरसीकर 
नायगाव तालुक्यातील नरसी येथे जीवन विकास प्राथमिक शाळेत लहान बालकांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  या सांस्कृतीक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी देश भक्ती गीतांवर व महापुरुषांच्या गीतावर तसेच नाटकांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.या शाळेतील चिमुकले विद्यार्थी अनेक गितावर अप्रतिम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली असून जीवन
 विकास प्राथमिक शाळेच्या वतीने यावर्षी स्नेह संमेलन शाळेत पार पडले आहे 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागेश मेटकर हे होते तर व्यासपीठावर  चिंतावार सर,पञकार गंगाधर गंगासागरे, आनंदराव सुर्यवंशी, दिलीप वाघमारे, गोविंद टोकलवाड,शंकर टोकलवाड, शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर नरसीकर आदिंची उपस्थिती होती.पालक खंडू देवकर, गोविंद पवार, मसुद चाउस उपस्थित होते.
शाळेतील पहीली ते सातवी वर्गात शिक्षण घेत असलेले चिमूकले विद्यार्थी अनेक गितावर अप्रतिम नृत्य सादर केले. यानंतर मेरा रंग दे बसंती चोला, माझी सखी बायको गेली, भुतान झपाटल, लावणी सह अनेक गितावर येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली आहे 

यावेळी शाळेतील विद्यार्थी, पालक, तसेच नरसी सह परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनमंत चिंतले व जिलानी बागवान यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षक मारोती जाकोरे, रमेश ताटे, यशवंत गायकवाड, कवटीकवार, माने, शिक्षिका घोशे,फेदेवार, गडपलेवार सह आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments