Header Ads Widget

आंतरगावात घरगुती प्रकरणातून घडलेल्या प्रकरणाच्या घटनेतील सत्य काय ? - वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाऊन ही काही फायदा होत नसल्याने शेतकऱ्यांचा अखेरचा पवित्रा !!

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील शेतकऱी भावाला भावानी ऊस तोडून घेऊन जाण्यासाठी रस्ता देत नसल्याच्या संदर्भात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाऊन सुद्धा कसल्याच प्रकारचा सदरच्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्यामुळे स्वतःच्या आग लावून जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरघुती प्रकरणाच्या घटनेतील सत्य काय ? प्रश्न जनसामान्य माणसाला पडला आहे
तालुक्यातील आंतरगाव येथे भावाभावात काही किरकोळ वाद असल्याचे सांगण्यात येते परंतु सदरच्या भावाचा ऊस शेतातच राहत असल्यामुळे तोडणीसाठी आडचण नातेवाईक करीत असल्याचा आरोप करीत आंतरगावच्या शेतकऱ्यांना ऊसाला बर्निंग ( आग ) लावली व त्यात उडी मारून आत्महत्या करण्यासाठी जात असताना काही गावातील सुज्ञान नागरिकानी समजावण्याचा प्रयत्न करीत त्यांना धरून शांत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे
आंतरगावच्या शेतकऱ्यानी या संबंधित विभागाकडे सदरच्या प्रकरणाची माहिती व न्याय मिळावा म्हणून अनेक वेळा गेलो असल्याचा आरोप करीत माझ्या कडे कोणी लक्ष देत नसल्यामुळे हा अखेरचा पवित्रा घेतल्याचे सदरच्या व्हिडीओच्या माध्यमातून समजल्या जात आहे

खरे हा नेमका प्रकार काय ? संशोधनाचा विषय बनला असल्यामुळे आणि शेतकऱ्यानी असा ही आरोप केला की गावातील राजकारणामुळे मी कोणा कोणाच्या विरोधात जावू असे त्यांनी सांगितले आहे

आंतरगावात घरगुती प्रकरणातून घडलेल्या प्रकरणाच्या घटनेतील सत्य काय ? - वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाऊन ही काही फायदा होत नसल्याने शेतकऱ्यांचा अखेरचा पवित्रा  घेतला असल्याचे शेतकऱ्यांचे वैताककुन म्हणे असले तरी अधिकाऱ्यानी तत्काळ तोडगा काढावा असे जाणकार लोकांचे मत आहे 


Post a Comment

0 Comments