Header Ads Widget

मुंबई येथे होणाऱ्या जवाब दो आंदोलनाला हजारो कार्यकर्ते जाणार गंगाधर कोतेवार यांची माहिती !!


नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे 

महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाचा ज्वलंत प्रश्न आरक्षण वर्गीकरण आणि आर्टिच्या  निर्मिती बाबत राज्य सरकारला जॉब विचारण्यासाठी दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ रोजी आझाद मैदान मुंबई येथे जवाब दो आंदोलन होणार आहे 

या आंदोलनाला नायगाव तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते गंगाधर कोतेवार यांनी दिली आहे 

सकल मातंग समाज व सत्संग समाजाच्या गेल्या अनेक वर्षापासून विविध मागण्या वंचित असून शासन दरबारी सदर समाजाच्या अनेक मागण्या धुळखात पडले आहेत

समाजाचा ज्वलंत प्रश्न आर्टी, अ ब क ड वर्गीकरणासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ रोजी जवाब दो आंदोलन होणार असून या आंदोलनात महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज मोठ्या प्रमाणात येण्याची संकेत आहेत 

नायगाव तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार असून मातंग समाजाने मोठ्या प्रमाणात या जवाब दो आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन गंगाधर कोतेवार, माधव बैलकवाड, मधुकर जवळे,अक्षय बोयाळ, प्रभाकर घंटेवाड, अविनाश धर्मकारे, माणिक कोतेवार, गजानन कांबळे, रमेश कोतेवार, पांडुरंग भंडारे यासह अधिजणांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments