Header Ads Widget

राहेरच्या भूमिपुत्राने काळेश्वरच्या डोहात बुडणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाला दिले जीवदान भावी शिक्षक नरहरी जोशी च्या आदर्श पाठाचे सर्वत्र कोतुक


नायगाव विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :- 


नायगाव तालुक्यातील राहेर येथील रहिवाशी असलेल्या नरहरी जोशी या तरुण युवकाने नांदेडच्या विष्णुपुरी येथील काळेश्वरच्या डोहा जवळ  सेल्फी काढण्याच्या नादात डोहात पडलेल्या त्या तरुणाचा पाय निसटल्याने  डोहात पडल्या नंतर गटांगळ्या खात बुडू लागलेला पाहून क्षणाचा विचार नकरता पाण्यात उडी घेत त्या विद्यर्थ्याचा प्राण वाचवून एक आदर्श पाठ निर्माण केल्याची घटना नुकतीच घडली असल्यामुळे भावी शिक्षक नरहरी जोशी च्या आदर्श पाठाचे सर्वत्र कोतुक
आहे
    
नांदेड जवळील धनेगाव येथील रहिवासी व तंत्रज्ञान डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या युवकाने २७ जानेवारी २३ रोजी सेल्फी काढण्याचे नादात विष्णुपुरी प्रकल्पाच्या डोहात पडला त्या ठिकाणी उपस्थित लोकांनी बघ्याची भूमिका घेत तेथे गर्दी केली पण कोणीच धाडस केले नाही पण नायगाव तालुक्यातील राहेर येथील भूमिपुत्र नरहरी प्रकाशराव जोशी यांनी कोणताच विचार न करता  तो तरुण बुडत असलेला पाहून प्रसंगावधान साधत त्या डोहात उडी मारून त्या तरुणास बाहेर काढत जीवदान दिले यामुळे नरहरी जोशी यांचे सर्वत्र व समाजातील सर्व स्तरातून  कौतुक होत आहे.
तालुक्यातील राहेर येथील रहिवाशी व सध्या सगरोळी संस्थेत नौकरीवर असलेले प्रकाशराव जोशी यांचे सुपुत्र नरहरी जोशी कंधार तालुक्यातील बाचोटी येथे जिजाऊ अध्यापक महाविद्यालयात बी.एड. च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून, त्यांचे नुकतेच वाघाळा येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत वार्षिक पाठ लागल्यामुळे ते वार्षिक पाठ घेण्यासाठी २७ जानेवारी रोजी शाळेत गेले असता त्यांना पाठ घेण्यासाठी वेळ असल्याने येथे विनाकारण वेळ घालवण्या पेक्षा त्यांनी काळेश्वर येथे काळेश्वाराचे दर्शनासाठी विष्णुपुरी येथे गेले होते तेथे त्यांना डोहा समोर माणसांची गर्दी दिसून आली होती

त्या गर्दीकडे मोर्चा वळवत त्यांनी त्या डोहात बुडत असलेला तरुण पाहिला‌ अन् प्रसंगावधान साधत, आपल्या जीवाची पर्वा न करता तात्काळ डोहात उडी घेऊन त्या महाविद्यालयीन तरुणाचे जीव वाचविले. आणि तेथे असणाऱ्या सर्वांचा जीव भांड्यात पडला. उपस्थितांनी नरहरीच्या त्या धाडसाचे कौतुक केले. 
  
या प्रकरणाने वार्षिक पाठ असलेल्या त्या शाळेत जाण्यास उशीर झाला पण त्याच्या धाडसाचे कळाल्या नंतर शाळेच्या मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी त्याचे कौतुक करीत मनापासून स्वागत व सत्कार केला.

एकाचा प्राण वाचवला यातच माझ्या जीवनाची धन्यता
  नरहरी प्रकाश जोशी - 

मला आश्रम शाळेतील त्या वार्षिक पाठाला वेळ असल्याने, मी काळेश्वर येथे दर्शनासाठी गेलो, आणि ती घटना पाहून मी कोणत्याही प्रकारचा विचार न करता, तात्काळ डोहात उडी घेऊन, त्याचे प्राण वाचवले. आई-वडिलांचा एकुलता एक असणाऱ्या त्या तरुणास मी जीवदान देऊ शकलो. यातच माझ्या जीवनाची  धन्यता वाटते नरहरी प्रकाशराव जोशी - मु.पो.राहेर ता.नायगाव धन्य माझी कूस पावन झली
            माता सुनीता प्रकाश  जोशी

माझा मुलगा नरहरी याने एखाद्या तरुणाला जीवदान देत, आई-वडिलांपासून काळाने हिरावून नेणाऱ्या मुलास वाचवले. यामुळे आमच्या मुलाचा आम्हाला अभिमान वाटतो. त्याचा तो वार्षिक पाठ बुडाला असेल, पण त्याने हे कार्य करून एक आदर्श पाठ निर्माण केला आहे.

आई वडील यांचे त्याने नाव केले या मुळे माझी कूस पावन झाली - सौ.सुनीता प्रकाशराव जोशी

मुलाच्या धाडसाचे मला अभिमान वाटतो प्रकाश जोशी राहेरकर

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे या न्यायाप्रमाणे व संत वचना प्रमाणे माझ्या जीवनाचे सार्थक झाले.माझा नरहरी नावाचा मुलगा एखाद्याचे प्राण वाचवून जीवदान देऊ शकला हे ऐकून माझ्या जीवनाचे सार्थक झाले व मी त्याचा वडील म्हणजे माझ्या मुलाच्या या कार्याचे कौतुक तर वाटते अभिमान ही वाटतो अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

नरहरी जोशी ने समाजात आदर्श निर्माण केला --

         "   जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांडे "

ब्राह्मण युवकाने केलेल्या धाडसाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे राहेर ता.नायगाव येथील  वडील प्रकाश जोशी व माता सुनीता जोशी यांच्या पोटी जन्माला आलेल्या नरहरी नामक या युवकाने भक्त प्रल्हाद याना वाचवण्या साठी स्थंभातून प्रगटलेल्या नृसीव्हा सारखा अवतार घेत काळाच्या दाढेतून युवकाचा वाचवलेला प्राण .एक समाजा पुढे आदर्श निर्माण करणारा असून या युवकांच्या कार्याची दखल प्रशासनाने घ्यावी.व त्याचे कोतुक करावे अशी मागणी आ.भा.ब्राह्मण महासंघ ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांडे यांनी केली आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments