Header Ads Widget

महाशिवरात्री व शिवजयंती निमित्य आशा हॉस्पीटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !!

           माधव पवार  
महाशिवरात्री  व शिवजयंतीचे औचित्य साधून आशा हॉस्पिटल सर्जिकल,मॅटर्निटी व गर्भसंस्कार केंद्र शिवाजीनगर नांदेड यांच्या वतीने महादेव मंदिर कोटीतिर्थ तालुका नांदेड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.या शिबीराचे उद्घाटन सरपंच सटवाजी सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले आहे

प्रमुख पाहूणे म्हणून श्री बापू महाराज,माजी सभापती बबनराव वाघमारे,देविदास सरोदे,पोलीस पाटील विजय वाघमारे,माजी सरपंच शामराव सूर्यवंशी,बालाजी वाघमारे,वामन वाघमारे,मोतीराम मेणे हे उपस्थित होते.या शिबीरात १५० रुग्णांची मोफत तपासणी डॉ.नामदेव सोनटक्के व डॉ.सौ.शितल सोनटक्के यांनी केली.मोफत रक्त तपासणी शिबीराचा लाभ १०० रुग्णांनी घेतला आहे

या आयोजित केलेल्या शिबिरात गरजू व गरिब रुग्णांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मोफत अत्यावश्यक औषधी वाटप करण्यात आली आहे 

कोटीतीर्थचे सरपंच सटवाजी सूर्यवंशी यांनी डॉ.नामदेव सोनटक्के व डॉ.सौ.शितल सोनटक्के यांनी आमच्या ग्रामीण भागात येवून गोरगरिब रुग्णांची तपासणी करुन मोफत औषधी वाटप केल्याबद्दल डॉक्टरद्वयांचे आभार व्यक्त केले.तसेच माजी सभापती बबन वाघमारे यांनी दोघांचाही सत्कार केला.सेवाभावी वृत्तीने काम करणाया डॉ.सोनटक्के दांपत्याचे कौतूक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments